स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
कुडाळ येथे नटराज फेस्टीवल च्या माध्यमातून जावलीकरांसाठी मनोरंजनाचा खजिना
कुडाळ.दि.१०. कुडाळ ता.जावली पंचक्रोषीतील भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ख्याती असलेल्या व धार्मिकतेला सामाजिक बांधिलकीची गेल्या 46 वर्षांपासून जोड देत कार्यरत राहिलेल्या मानाचा महागणपती नटराज युवक मंडळाने यावर्षी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त नटराज फेस्टीवल 2024 च्या संकल्पनेतून सलग तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन केले आहे.
कुडाळ नगरीत दरवर्षी होत असलेल्या या स्तुत्य उपक्रमातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचा तसेच ग्रामिण भागातील जनतेला मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा मानस आहे. मा.आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रतापगडचे अध्यक्ष मा. श्री. सौरभबाबा शिंदे यांच्या सहकार्यातून तमाम जावलीकरांसाठी मनोरंजनाचा खजीनाच यानिमित्ताने नटराज फेस्टीवलच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे.
रविवार ता.११/०२/२०२४ रात्री ९.०० वा.झी टॉकीज गजर किर्तनाचा फेम व महाराष्ट्रातील सुप्रसिध्द बाल किर्तनकार ( छोटे इंदुरीकर ) ह.भ.प.माऊली महाराज काकडे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे,तर सोमवार ता.१२/०२/२०२४ रात्री ९.०० वा. सिनेस्टार लावण्यवती सायली केळकर यांचा अभिमान महाराष्ट्राचा हा बहरदार लोकसंगीताचा कार्यक्रम असून त्यामध्ये खास आर्कषण “रामायण” सादरीकरण व शाहीर पोवाडा होणार आहे, तर मंगळवार ता..१३/०२/२०२४ रात्री ९.०० वा. राज्यस्तरीय नामांकीत शास्त्रीय संमोहनतज्ञ व अभ्यासक श्री गणेश सप्रे हिप्नॉटिझम कार्यक्रम होणार आहे.
तसेच गणेश जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचेही आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे, तरी सर्व कार्यक्रमांचा आस्वाद नागरिकांनीघ्यावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे