
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा.दि .०४. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांनी अत्यंत चांगला उपक्रम राबविला असून यामुळे कामगार वर्गास प्रोत्साहन मिळत आहे असे प्रतिपादन शैलेंद्र पोळ अपर कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य,पुणे विभाग यांनी केले
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त
गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा आयोजित आदर्श कामगार पुरस्कार २०२४ चे आयोजन गोदरेज अँड बॉइस मॅन्यू कं. लि. लोक्युम ग्रुप शिरवळ तालुका खंडाळा येथे कंपनीचे प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.या वेळी ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर रेवणनाथ भिसले सहाय्यक कामगार आयुक्त सातारा,अभय पेंडसे व्हा. प्रेसिडेंट अँड प्लॉट हेड ,गोदरेज अँड बॉइस मॅन्यू कं. लि. लोक्युम लॉकिम मोटर्स शिंदेवाडी,शिरवळ तालुका खंडाळा,गुणवंत कामगार प्रतिष्ठान संस्थापक दिलीपचरेगावकर,गोपाळ खजुरे,प्रतिष्ठान अध्यक्ष इक्बाल काझी,तसेच सर्व पदाधिकारी, उपस्थित होते.

अधिक बोलताना त्यांनी सांगितले की,सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय सुरू असून येथील कामगार वर्ग मोठया प्रमाणात कार्यरत आहे भविष्यात यांना गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांनी सहकारी केले तर जास्तीत जास्त गुणवंत कामगार पुरस्कार सातारा जिल्ह्यातील कामगारांना मिळेल आणि सातारा जिल्हा आदर्शवत कामगार जिल्हा म्हणून ओळखला जाईल.या वेळी त्यांच्या आणि उपस्थित पाहुणे तसेच गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते आदर्श कामगार पुरस्कार २०२४ चे मानकरी श्री संजय भैरू जाधव (गोदरेज अँड बॉईस मँन्यु. कं. लि., लॉकिम मोटर्स, शिंदेवाडी, शिरवळ २). श्री मकरंद बाबुराव पवार (गरवारे टेक्निकल फायबर्स लि., वाई) ३) श्री सुरेश हणमंत मोरे (गोदरेज अँड बॉईस मँन्यु. कं. लि., लॉकिम मोटर्स, शिंदेवाडी, शिरवळ ४) श्री रविंद्र मारुती पवार ( महाराष्ट्र स्कूटर्स लि., सातारा) ५) श्री शेखर नथू पवार (गरवारे टेक्निकल फायबर्स लि., वाई) यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला .

सदर आदर्श कामगार पुरस्कार कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि कै.गोदरेजजी यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून झाली.सुरवातीला सावित्रीबाई फुले महाविद्यालय येथील विदयार्थी यांनी स्वागत गीत ,इशस्तवन,आणि महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोपाल खजुरे साहेब यांनी केले.सूत्रसंचालन कार्याध्यक्ष जयंत देशपांडे यांनी करताना गुणवंत कामगार प्रतिष्ठान ची स्थापना,त्यांनी केलेल्या कामाची आठवण ,आणि सर्वजण एकत्र येऊन करत असलेली काम यामुळेच प्रतिष्ठान करत असलेली प्रगतीचा आलेख उंचावत आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे आभार अभिजीत शिंगटे यांनी मांडताना या पुरस्कार प्राप्त कर्मचारी यांना कुटुंबाची मिळणारी साथ,मित्रांची साथ,समाजातून निर्माण झालेली ओळख ही जमेची बाजू आहे असे सूचित केले.या आदर्श कामगार पुरस्कार करीता गोदरेज अँड बॉइस मॅन्यू कं. लि. लोक्युम लॉकिम मोटर्स शिंदेवाडी,शिरवळ यांचे पदाधिकारी ,कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले होते.


कर्मचारी यांना आता आपले कलाकौशल्य दाखविणे गरजेचे बनले आहे.नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी ओळखता आले पाहिजे. कंपनी नेहमी आपले कर्मचारी वर्ग यांच्या बाजूने सकारात्मक विचार करत असून कंपनीच्या वाढीकरिता सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे.
अभय पेंडसे
व्हा. प्रेसिडेंट अँड प्लॉट हेड ,गोदरेज अँड बॉइस मॅन्यू कं. लि. लोक्युम लॉकिम मोटर्स शिंदेवाडी,शिरवळ
गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा जिल्ह्यातील अनेक कर्मचारी यांना न्याय मिळवून देणारी असून
आदर्श कामगार ते गुणवंत कामगार पुरस्कार करीता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली पहावयास मिळते त्यामुळे प्रतिष्ठानची कार्यपद्धती समजते यामुळे ती कर्मचारी यांना आपल्या जवळची वाटते.
दिलीप चरेगावकर
संस्थापक
गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा
