क्राईमसातारा

अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मेढा पोलिसांची कारवाई
५ लाख ७८ हजारांचा  मुद्देमाल केला जप्त



मेढा.दि.०५.जावळी तालुक्यात केळघर नाजिक  गुटख्याची अवैद्य चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणारे इसमांवर मेढा पोलिसांनी  मोठी कारवाई करून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या गुटख्याचा मुद्वेमाल व वाहन असा एकूण ५.७८ ७१२/- रूपयांचा मुद्देमाल  संबधीत इसमाकडून जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी वाई बाळासाहेब भालचिम यांनी लोकसभा निवडणुक अनुशंगाने अवैद्य व्यवसायांवर छापे टाकून कारवाई करणेबाबत आदेशीत केलेले होते.तसेच  लोकसभा निवडणुक अनुशंगाने पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य वाहतुक अथवा तत्सम अवैद्य गोष्टींवरआळा बसणेसाठी स्थायी निगराणी पथक नेमण्यात आलेले होते.

पोलिसांकडूनमिळालेल्या माहितनुसार  मौजे केळघर ता.जावली, गावचे हद्दीमध्ये नेमण्यात आलेले स्थायी निगराणी पथक हे त्यांचे नेमलेले केळघर येथील पॉईटवर वाहणांची तपासणी करीत असताना मेढा बाजूकडून केळघर बाजूकडे एक पांढरे रंगाची महिद्रा कंपनीची बॊलेरो गाडी येत असलेली दिसली.सदर वाहनास थांबवून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये गुटखा, पान मसाला असलेबाबत आढळून आले. पोलीस कर्मचारी व पंचांचेसमक्ष जावुन खात्री करून सदर वाहनांमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असणारेअवैद्य गुटखा मिळून आल्याने सदर वाहनांवरील  इसम अशोक रामचंद्र धनावडे,ऋतीक आनंदा सपकाळ, विद्याधर सखाराम धनावडे  सर्व रा.मोहाट ता.जावली जि.सातारा यांना  घेण्यात आले आहे.

तर हा गुटखा अतुल बाजीराव धनावडे रा.मोहाट ता.जावली जि.सातारा याचा असल्याचे सांगीतले व त्याचेच सांगणेवरून सदरचा माल विक्री करणेकरीता घेऊन आलेलो आहे, असे सांगितलेने त्यांचे कब्जात मिळुन आलेला गुटखा
पान मसाला व एक पांढरे रंगाची महींद्रा कंपनीची बॊलेरो मँक्सीट्रक प्लस पिकअप एम.एच.११ डी.डी. ০९८२ असा एकुण ५७८ .७१२/- रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेवुन जप्त करणेत आलेला आहे.


    सदर कारवाईत मेढा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक,संतोष तासगांवकर, सहाय्यक फौजदार गंगावणे, पोलिस हवलदार डी.जी. शिंदे, पोलिस हवालदार जायगुडे, पोलिस कॉन्स्टेबल सनी काळे,घोरपडे, वाघमळे,मोरे अभिजित वाघमळे यांनी सहभाग नोंदवला

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!