नवमतदारापासून ते ९३ वर्षाच्या वयोवृत्तापर्यंत मतदान….
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
मेढा. दि.०७. राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच ११ मतदारसंघांतील ११ जागांसाठी मतदान होते .मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी मोठया संख्येने रांगा लावल्या होत्या.सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.या लढतीकडे राज्याचे लक्ष वेधले असून अनेक शहराबरोबर ग्रामीण भागात उत्साहाच्या वातावरणात मतदान प्रकिया पार पडली.
आज सकाळ पासून उष्णतेचा पारा वाढत असताना सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवत होते .मतदान केंद्रावर महीला पुरुष यांच्यासह अनेक जेष्ठ ही आपले मत देण्यासाठी हजर होते.मतदान केंद्राचे बाहेर ठिकठिकाणी मतदारांना व्होटिंग स्लीप देण्यासाठी बूथ उभे केले होते,काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच ठिकठिकाणी आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हजर होते.
नवमतदारापासून ते ९३ वर्षाच्या वयोवृत्तापर्यंत मतदान….
मतदासंघातील 18 वर्षानंतर मतदानाचा अधिकार मिळालेल्या तरुण नवमतदारांनी मतदान केंद्रावर येऊन रांगेत उभा राहून मोठ्या उत्साहात प्रथमच मतदान केले. तरआसनी तालुका जावली येथील मतदान केंद्रावर आज ओखवडी गावच्या ९३ वर्षे वयाच्या आजी बनाबई रामचंद्र शेलार यांनी आपल्या मुलासोबत मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.यांच्यासह अनेक वयोवृद्धांनी ही आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या सायंकाळी 5 पर्यंत झालेले मतदान…
53.40 टक्के मतदान.लातूर – 55.38 %.सांगली — 52.56 %.बारामती — 45.38%.हातकणंगले- 62.18%.कोल्हापूर — 63.71%.माढा — 50%.धाराशिव – 52.78%.रायगड — 50.31%.रत्नागिरी— 53.75%.सातारा — 54.11%.सोलापूर – 49.7%