सातारासामाजिक

जवळवाडी येथिल वैभवी जवळ बारावी काॅमर्स मध्ये द्बितीय.

मुलीच्या सन्मानाने भारावली सामान्य शेतकरी कुटुंबे.

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–

मेढा. दि.२४.आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये बारावी काॅमर्स मधुन ८५% गुण मिळवून द्वितीय आलेली जवळवाडी येथिल सामान्य शेतकरी व वारकरी कुटुंबातील सुकन्या कु.वैभवी बाबुराव जवळ या गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार जवळवाडी ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त मा.सरपंच सौ.वर्षाताई जवळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.


इयत्ता बारावीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या निकालातही मुलीच पुढे असल्याचे दिसून येत आहे.
जवळवाडी गावातही सर्वच बारावीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु.वैभवी बाबुराव जवळ हिने बारावी काॅमर्स मध्ये ८५% गुण मिळविले असून त्या पाठोपाठ टेलरींग व्यवसाय करणार्‍या दांपत्याची कन्या कु.वृषाली चंद्रकांत जवळ हिने बारावी काॅमर्स मध्ये ७४%गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.
अत्यंत प्रतिकुल परस्थितीमध्ये व घरातील, शेतातील सर्व कामे करीत आई-वडीलांना हातभार देणारी,सार्वजनिक सण उत्सवात हिरीरीने सहभागी होणारी वैभवी अभ्यासातही तितकीच हुशार असून तिने मिळविलेले यश प्रेरणादायी आहे.टेलरींग व्यवसाय करणार्‍या दांपत्याची कन्या कु.वृषाली चंद्रकांत जवळ हिने मिळविलेले यशही कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार यावेळी सौ.वर्षाताई जवळ यांनी व्यक्त केले.


या दोन्ही मुलींच्या घरी जावून सहकुटुंब सत्कार यासाठीच आम्ही करीत आहोत यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी मेहनत,जिद्द, चिकाटीने अभ्यास करून यशस्वीतेची गिरीशिखरे अशीच पादाक्रांत करावीत अशाशब्दात विलासबाबा जवळ यांनी यशस्वी सर्वच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बाबुराव जवळ, वैशाली जवळ,चंद्रकांत जवळ, सुनिता जवळ, वेणूबाई जवळ,दत्ताबाबा जवळ,विशाल चव्हाण,माय जवळ इ.उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!