
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——
मेढा.दि.२९. आज भैरवनाथ मंदिर जवळवाडी येथे ग्रामपंचायत व भैरवनाथ तरुण मंडळ जवळवाडी यांच्यावतीने इयत्ता दहावी मधील 12 व इयत्ता बारावीमधील 14 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राध्यापक प्रशांत चोरगे सर,सरपंच सुरेखा मर्ढेकर प्रा. प्रकाश जवळ,साहेबराव धनावडे,सुरेश बुवा जवळ, सतीश मर्ढेकर,सागर जवळ,बबन जवळ,रमेश पाटील, आनंदा जवळ,शंकर जवळ,उपस्थित होते.
प्रा.चोरगे सर म्हणालेविद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवून पुढील शैक्षणिक धोरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे. सचोटी प्रामाणिकपणा व कष्ट करण्याची सवय अंगीकारावी.पालकांनी मुलाच्या शिक्षणाचे आर्थिक नियोजन करून त्यांना सतत मार्गदर्शन करत राहिले पाहिजे.
या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ, महिला मंडळ, विध्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश मर्ढेकर यांनी केले तर आभार प्रकाश जवळ यांनी मानले.