सातारासामाजिक

मेढा येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता पदी सुरेंद्र भुतकर यांची नियुक्ती

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——

मेढा, दि.०४.  जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता पदी सुरेंद्र राजेंद्र भुतकर यांची नियुक्ती झाली आहे . त्यांनी नुकताच या पदाचा पदभार स्वीकारला आहे .


      सुरेंद्र भुतकर हे मूळचे वाई येथील  असून त्यांनी सहाय्यक अभियंता सेवा यापुर्वी त्यांनी,  सातारा शहर ,रत्नागिरी जाकादेवी,सातारा त्यानंतर मेढा येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी पदभार स्विकारला आहे .


     डोंगराळ आणि दुर्गम अशा जावळी तालुक्यात विद्युत वितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी या नात्याने काम करणे अतिशय आव्हानात्मक आणि जिकारीचे असते त्यामुळे येथे काम करताना अतिशय नियोजनबद्ध काम करावे लागते . यापूर्वी सुरेंद्र भुतकर यांना पाटण कराड रत्नागिरी अशा तालुक्यातही त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम केले आहे . त्या कामाचे कौतुकही त्या त्या ठिकाणी झालेले असून त्यांचा सन्मान सत्कार झालेला आहे .त्यामुळे जावली तालुक्यातील उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भुतकर यांच्या माध्यमातून निश्चित चांगले काम होईल . अनेक प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वासही सावलीचे सरपंच विजय सपकाळ यांनी व्यक्त केला .


विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता पदी सुरेंद्र भुतकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार सावली गावचे सरपंच विजय सपकाळ व ओझरेचे माजी उपसरपंच अजित लकडे(आप्पा) यांनी केला .

जावळी तालुका दुर्गम आणि डोंगराळ असला तरी तत्पर सेवा देऊन आणि ग्राहकांच्या अडचणी समस्या आम्ही प्राधान्याने सोडवू.

उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भुतकर

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!