स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
मेढा.दि.०४. बदलापूरसारख्या घटना घडू नयेत यासाठी मेढा पोलिसांनी तालुक्यातील सर्व जि.प.शाळा,माध्यमिक शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली होती.अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी शाळांना विविध उपाययोजना करण्याच्या सूचना सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिल्या.
जावली तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक मेढा पोलिस स्टेशनमध्ये झाली. यावेळी एकूण ३५ शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,प्राचार्य हजर होते.
शाळांनी कर्मचारी नियुक्त करताना चारित्र्य पडताळणी करणे
आवश्यक आहे. सर्व शाळांमध्ये सी सी टि व्ही बसविणे सक्तीचे आहे.शाळेच्या सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळू नये, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक,प्राचार्य, ग्रामस्थ यांनी खबरदारी घ्यावी.शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणेही आवश्यक आहे.अशा विविध सूचना जावली तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिल्या. यावेळी एकूण ३५ शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, प्राचार्य हजर होते.