स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
मेढा दि.११.
सायगाव ग्रुप विकास सेवा सोसायटीची निवडणूक युवा नेते प्रवीण नाना देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.विकास सेवा सोसायटीचा कायापालट झाल्या शिवाय राहणार नाही पुढील काळामध्ये संस्थेला मिळालेल्या फायद्यातून सभासदांना लाभांश वाटप करणे,शासकीय योजनांचा सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणार व सोसायटीच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणे साठी दहा लाखाची तरतूद केली असल्याचे प्रवीण देशमाने यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक निबंधक नानासाहेब रूपनवर व बापूसाहेब धनावडे उपस्थित होते.
यावेळी चेअरमन सुनील कदम व्हा.चेअरमन उमेश ढवळे. सुहास भोसले, स्वप्नील डोंबे, रामचंद्र जाधव, अतुल भोसले, शिवाजी कदम, अरुण ढवळे, सुभाष देशमुख, साखरे गुरुजी,जयवंत कदम, दशरथ ससाणे, संजय राजमाने, अभिजित दुदुस्कर, निलेश गायकवाड, सागर शिवणकर, पृथ्वीराज कदम, मुन्ना मुसळे, सुरेश भोसले, महेश राजमाने,अशोक सावंत अविनाश जगताप,रवी ससाणे, सुभाष मेरुलिंगकर, सुजित कदम, सचिन ससाणे, जितेंद्र भानसे, यांच्या सह संचालक संजय दुदुस्कर , सुरेश भोसले, संदीप माने, जयवंत वाघमारे, राजश्री कदम, ललिता करंजकर, सचिन ससाणे, जगन्नाथ पवार, शिवाजी जाधव, व सभासद उपस्थित होते.
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,वसंतराव मानकुंबरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, व समिर आतार यांच्यासह,राजकीय,सामाजिक तसेच ग्रामस्थ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप माने यांनी केले व आभार जयवंत कदम यांनी मानले.