आ.शिवेंद्रसिंहराजे भोसलेसातारा

औरंगजेबाला सुद्धा जमले नाही मग तुम्ही कोण? ना. शिवेंद्रसिंहराजेंचा सवाल;

स्टार ११ महाराष्ट्र

 

कर्नाटकातही लवकरच भगवा ध्वज फडकेल ..ना. शिवेंद्रसिंहराजें

सातारा.दि.०७.     छत्रपती शिवाजी महाराज आणि लहानग्या शंभुराजांना औरंगजेब आग्र्याच्या कैदेत रोखू शकला नाही. आज साडेतीनशे वर्षे उलटून गेली तरी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांच्याबद्दलचे प्रेम प्रत्येकाच्या नसानसांत भिनलेले आहे. जो औरंगजेब छत्रपतींना रोखू शकला नाही मग, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापासून रोखणारे तुम्ही कोण, असा परखड सवाल छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. दरम्यान, कर्नाटक राज्यातही लवकरच भगवा ध्वज फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

अनगोळ (बेळगाव) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण व दुग्धाभिषेक सोहळ्यात ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी आमदार अभय पाटील, महापौर सविता कांबळे, माजी महापौर शोभा सोमणाचे, नगरसेवक गिरीष धोंगडी, भाजपचे धनंजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो शिवप्रेमी माता- भगिनी व नागरिक उपस्थित होते. 

याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे यांची शहरातून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यांनतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करण्यात आला. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले. ते दैवी शक्ती होते. त्यामुळेच आजही अनेकांना हिंदवी स्वराज्यासारखे स्वराज्य स्थापन व्हावे, असे वाटत असते. कर्नाटकाच्या प्रशासनालाही हीचे अपेक्षा आहे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. छ. शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे नव्हते तर, ते १८ पगड जातीचे होते. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांना खुद्द औरंगजेब रोखू शकला नाही तर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला, अभिषेक सोहळ्याला कोण रोखू शकतो! सत्तेचे चक्र फिरते असते. त्यामुळे लवकरच कर्नाटकातही भगवा ध्वज फडकणार आहे, असे ते म्हणाले.

 

आमदार अभय पाटील म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा अनगोळकरांचा मान आहे. छत्रपती शिवरायांच्या वंशजांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची बेळगावच्या आणि कर्नाटकच्या इतिहासात नोंद होईल. आम्ही महापालिकेत ठराव केला नसता तर हा पुतळा झाला नसता. सरकारच्या माध्यमातून आडकाठी आली तरी, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे तुमच्या परिश्रमाला यश आले आहे. ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार आणि ज्यांनी विरोध केला त्यांचा योग्य वेळी हिशोब चुकता करू, असा इशाराही आ. पाटील यांनी यावेळी दिला. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!