
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा दि.१९. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातमोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू झाला आहे त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी धरण पायथा विद्युतगृहा मधून ५०० क्युसेक ने दिनांक 19 जून 2025 रोजी सायंकाळी 7 पासून पाणी वेण्णा नदीपात्रात सोडणे आवश्यक आहे.
दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 6 पासून सांडव्या वरून वेण्णा नदी पात्रात अंदाजे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येईल आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येणाऱ्या येवानुसार धरणामधून सोडण्यात येणार्या विसर्ग मध्ये बदल करण्यात येईल. धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.