
वारकऱ्यांना रेनकोट देवून दिंडीची सुरुवात
स्टार ११ महाराष्ट्र
मेढा.दि.२३. हातात पताका, डोक्यावर तुळस आणि टाळ-मृदंगाच्या गजरात विश्वभर बाबा डिंडी सोहळ्याचे आषाढी वारीचे प्रस्थान शेकडो वारकऱ्यांच्या साक्षीने मेढयातून सुरू झाले असून दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून मेढ्याचे सपोनि सुधीर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

गुरुवारी दुपारी १ वाजता.मेढ्याच्या विठ्ठल मंदिरातून विना पूजन करून व वारकऱ्यांना श्रींमत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समुह व ज्ञानदेव रांजणे मित्र समुहाच्यावतीने रेनकोट देवून दिंडीची सुरुवात झाली.

मेढ्याचा मुख्य बाजार चौक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दिंडीचे प्रस्थानाला प्रारंभ झाला.जावली तालुक्यातील विश्वभर बाबा आध्यात्मिक वारकरी दिंडी सोहळ्याला अनेक वर्षाची परंपरा आहे.वै.ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे व वै.ह.भ.प.भिकूबूवा देशमुख या महाराज मंडळीनी तालुक्याला आध्यात्माची परंपरा घालून दिली. त्यांच नातू विश्वभर बाबा दिंडी सोहळ्याचे दिंडी मालक ह.भ.प.अतुल महाराज देशमुख यांच्या नेतृत्वा खाली दिंडी क्र.१६७ या दिंडीत तालुक्यातून बऱ्याच गावचे वारकरी, महिला तरुण युवक मोठया संख्येने सहभागी होवून मेढ्यात प्रस्थानापासून आळंदी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळ्यासाठी मार्गस्थ झाले असून शेकडो किलोमीटर पायी मजल-दरमजल करत हे वारकरी हरिनामाचा गजर करत आळंदीहून पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.

१९जून रोजी आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले असून यासाठी मेढा शहर आणि ग्रामीण भागातूनही दिंड्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी करून दिडशे ते दोनशे वारकरी अतुल महाराजांच्या दिंडीत सहभागी झाले आहेत.

विठूरायाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे वारकरी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असे म्हणत मार्गक्रमण करू लागले आहेत. यामध्ये विश्वंभरबाबा आध्यातिक वारकरी दिंडीने २५ वर्षे आपली परंपरा कायम राखली आहे. विशेषत: युवा पिढी निर्व्यसनी व्हावी आणि चांगली संगत मिळावी यासाठी काही जण स्वेच्छेने दिंडीत सहभागी होताना दिसत आहेत.
