
सातारा दि.२६. सातारा जिल्ह्यातील पात्र मच्छीमारांनी विहीत नमुन्यातील परिपुर्ण मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणी प्रस्ताव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) सातारा यांच्याकडे दि.15 जुलै 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप के.सुर्वे यांनी केले आहे.
पाटबंधारे विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे मत्स्यव्यवसायाकरीता हस्तांतरीत झालेला तलाव/जलाशय यावर मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाची नोदंणी केली जाते. सातारा जिल्ह्यामध्ये पुढीलप्रमाणे पाटबंधारे तलाव मत्स्यव्यवसाय करीता हस्तांतरीत झालेले आहेत.
वाई तालुक्यातील धोम बलकवडी तलावाचे 281 हेक्टर सरासरी जलक्षेत्र, सातारा तालुक्यातील चिखली तलावाचे 10 हेक्टर सरासरी जलक्षेत्र, सातारा तालुक्यातील पांगारे तलावाचे 14 सरासरी जलक्षेत्र हेक्टर, फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द तलावाचे 24 सरासरी जलक्षेत्र हेक्टर,

फलटण तालुक्यातील तिरकवाडी (जि.प.कडून हस्तांतरीत) तलावाचे 7 सरासरी जलक्षेत्र हेक्टर, सातारा तालुक्यातील पळसावडे तलावाचे 12 हेक्टर सरासरी जलक्षेत्र, माण तालुक्यातील लोधावडे तलावाचे 39 हेक्टर सरासरी जलक्षेत्र हेक्टर, माण तालुक्यातील खरातवाडी तलावाचे 13 हेक्टर सरासरी जलक्षेत्र हेक्टर, कराड तालुक्यातील किवळ तलावाचे 13 हेक्टर सरासरी जलक्षेत्र असे आहे.