
स्टार ११ महाराष्ट्र
नवीमुंबई.दि.०३. वेण्णा निरंजना पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोपरखैरणे येथे चेअरमन रविंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली बहुसंख्य सभासदांच्या उपस्थिती उत्साहात संपन्न झाली.
यावेळी सभेस मा.जलसंपदा मंत्री आ.शशिकांतजी शिंदे, नवी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विष्णु धनावडे, अभयलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन आनंदराव सपकाळ, शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथजी ओंबळे, जावली बँकेचे संचालक विश्वनाथ धनावडे, हे उपस्थित होते.
आ.शशिकांत शिंदे यांनी आपल्या मनोगतामधून संस्था नफ्यात आणल्याबद्दल कर्मचारी व संचालकांचे व सभासदांचे अभिनंदन करून मार्गदर्शक सुचना दिल्या.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन व महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना व संस्थापक वैकुंठवासी प्रतापराव शिंदे व रामचंद्र जवळ यांना विनम्र अभिवादन करून सभेला सुरुवात झाली संचालक सागर जवळ यांनी आपल्या प्रास्ताविकामधुन संस्थेविषयी संक्षिप्त माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले.उपाध्यक्ष रघुनाथ शेलार सर यांनी नफ्याची विभागणी सादर केली.सचिव प्रदीप वाघ,संचालक यदु चिकणे,जगन्नाथ बांदल,विनोद शिंगटे, सागर जवळ,अभयसिंह शिंदे,बाळासाहेब भोसले,राजेंद्र जाधव,दादु शेलार,संचालिका मिना जवळ,स्वाती गाडगे यांनी वेगवेगळ्या विषयांचे अहवाल वाचन केले.
मागील सभेचे इतिवृत्त संस्थेच्या व्यवस्थापक रुपाली मोरे यांनी सादर केले.अहवालावर उपस्थित सभासदांनी प्रश्नांची विचारणा केली असता त्याविषयी संस्थेचे चेअरमन रविंद्र मोहिते यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यामध्ये प्रामुख्याने सक्रिय सभासद प्रविणजी शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे शंकानिरसन केले. संस्थेला अहवाल वर्षात नफ्यात आणल्याबद्दल सर्वांनी कर्मचारी व संचालकांचे अभिनंदन करून व मार्गदर्शक सुचना करून सर्वानुमते अहवालाला मंजुरी दिली. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
या सभेस नवयुग पतसंस्थेचे चेअरमन विलासराव दळवी, जगदीश कदम,विशेष प्राविण्य मिळविलेले विनोद चिकणे,संदेश सुदामराव शिंदे, तुकाराम दळवी, सरपंच – मारुती चिकणे,रामदास वेंदे, सल्लागार गणपत पवार, आनंदराव जाधव, चंद्रकांत शेलार, काळेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किसन गणपत चिकणे, गोविंद चिकणे, सुधिर शेलार, संतोष भोसले, तुकाराम गोगावले, बबन बेलोशे,दत्ता सपकाळ, शाम जवळ,आनंदा सपकाळ , शैलेश सपकाळ, शामराव गोळे, शंकर चिकणे,वैभव सपकाळ सर,संतोष शिंगटे,नामदेव बांदल,डी वी बांदल, यशवंत जाधव, विजयकुमार लकडे,भरत धनावडे,दत्तात्रय धनावडे, नवीन मर्ढेकर,सूर्यकांत जवळ, शंकर वालूगडे, सदाशिव दुदळे,नवनाथ दुदळे,आनंदा शेलार,सखाराम शेलार,किशोर साळुंखे,राधिका ओंबळे,सुर्यकांत महाडिक, प्रशांत बेलोशे,एकनाथ पार्टे,विजय नवले,यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आ.शशिकांत शिंदे यांचे चेअरमन रविंद्र मोहिते व व्हा. चेअरमन रघुनाथ शेलार यांनी संचालकांच्या समवेत स्वागत केले तसेच विष्णु धनावडे यांचा पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.आपल्या मनोगतामधून चेअरमन रविंद्र मोहिते यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट करून सर्वाना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तसेच ग्रामीण भागात स्थलांतरित झालेल्या सभासदांसाठी संस्थेची मेढा येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला त्याला सर्व सभासदांनी सहमती दर्शविली.संस्थेच्या वतीने सर्वांना भिंतीवरील घड्याळ भेट देण्यात आले व सर्वांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती याबद्दल सभासदांनी संस्थेचे आभार मानले.नवी मुंबईतील पहिलीच सभा खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. संस्था प्रगतीचा नवा श्वास व विश्वास घेतेय याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक श्री. सागर जवळ यांनी केले. संचालक श्री. अभयसिंह शिंदे व संचालिका स्वाती जवळ गाडगे यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पाडला. संचालक विनोद शिंगटे यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.