सातारासामाजिक

ठाण्यात अँग्रीमिलेटस उद्योजक महिला शेतकरी उत्पादक कंपनीचा स्तुत्य उपक्रम

स्टार ११ महाराष्ट्र नवी मुंबई प्रतिनिधी —

               ग्रामीण मातीत रुजलेल्या परंतु आधुनिक उद्यमशीलतेची कास धरणाऱ्या कुसुंबी गावच्या संगिता वेंदे यांनी या महिला शेतकरी अँग्रीमिलेटस उद्योजक महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ठाण्यात आपल्या उत्पादनांचा स्टॉल उभारून एक अभिमानास्पद पाऊल उचलले आहे.

                 नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढीच्या माजी संचालिका राेहिनी दळवी यांनी या ठिकाणी साचेबंद रांगोळीची विविध उपकरणे स्टाँल उभारला आहे. या स्टॉलमध्ये स्थानिक शेतकरी महिलांनी स्वतः तयार केलेले आणि शेतीतून मिळवलेले सेंद्रिय व पारंपरिक उत्पादने मांडली असून,ग्राहकांना दर्जेदार माल थेट उत्पादकांकडून मिळण्याचा लाभ झाला.

दोन्ही नारी शक्तीच्या कार्यातून केवळ उत्पादन विक्री नव्हे, तर खुर्द गावच्या मातीतून आलेल्या श्रम, चिकाटी आणि उद्योजकतेची झलक ठाणेकरांना अनुभवायला मिळत आहे. एक माहेरवाशिण व एक सासुरवाशीण आपल्या गावाचा सन्मान वाढवते आहे, याचा प्रत्येक खुर्दकराला अभिमान वाटावा, असे हे कार्य आहे.मातीशी नातं जपून,नव्या वाटा शोधणाऱ्या महिलांचा हा यशस्वी प्रवास ग्रामीण सक्षमीकरण आणि स्त्रीशक्तीचा साक्षात नमुना ठरतोय.

म्हाते खुर्द गावचा अभिमान म्हणून या दोन्हीही स्टाँलला ठाण्यातील प्रसिद्ध व यशस्वी उद्योजक व आपल्या नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढीचे माजी चेअरमन मनोहर दळवी नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजेंद्र दळवी,उद्योजक व विद्यमान संचालक प्रकाश दळवी,वसंत दळवी यांनी सदिच्छा भेट दिली.यातून महिला उद्योजक महिलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळून म्हात्याची व्यावसायिक ओळख आणखी दृढ होईल.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!