जिल्हाधिकारी सातारासातारा

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान
– जिल्हाधिकारी संतोष पाटील

स्टार ११ महाराष्ट्र

सातारा दि१२.: हर घर तिरंगा हे अभियान सातारा जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध घटकांनी उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे अभियान राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.


जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय संस्था, महामंडळे, शासकीय व खाजगी इस्पीतळे व सार्वजनिक आस्थापना व खाजगी आस्थापनांची कार्यालये, कारखाने व दुकाने इत्यादी ठिकाणी तीन दिवसाच्या कालावधीत राष्ट्रध्वज यथोचित सन्मानाने फडकवण्यात यावा.


राष्ट्रध्वज सन्मानाने फडकविताना राष्ट्रगीत व राज्यगीत गावून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात यावी. तसेच राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. दि. १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ या दरम्यान सुर्योदयानंतर राष्ट्रध्वज फडकवणे व सुर्यास्तापुर्वी राष्ट्रध्वज उतरविणे बंधनकारक राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!