सामाजिक

ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने तरुण मतदारांमध्ये जागृती

स्टार ११ महाराष्ट्र —–

केळघर.जावली तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज उत्साहात मतदान पार पडले. तालुक्यात ३ गट आणि ६ गणांसाठी हे मतदान झाले असून, मतदारांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या.अनेक ठिकाणी ८० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःहून केंद्रावर येऊन मतदान केले. जावली तालुक्यात डोंगराळ भाग असूनही सकाळपासून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.जावलीत कुसुंबी,कुडाळ आणि म्हसवे या गटांमधील दिग्गज्यांमधील होणाऱ्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संवेदनशील मानल्या जाणाऱ्या केंद्रांवर जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जावलीतील केळघर,करहर,कुसुंबी,कुडाळ या गावांमध्ये मतदानासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. स्थानिक विकासकामे आणि पर्यटनाचे प्रश्न या निवडणुकीत प्रचाराचे मुख्य मुद्दे राहिले होते.ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न राहता थेट मतदानाची सुविधा दिली जात होती.मतदान केंद्रांवर व्हीलचेअर मदतीसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांनी दाखवलेला उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे.

दुर्गम भागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी नातेवाईकांच्या मदतीने मतदान केंद्रावर येऊन आपला हक्क बजावला.

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!