
स्टार ११ महाराष्ट्र
शिबीरांमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा : उपविभागीय अधिकारी सातारा याचे आव्हान
मेढा. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. मराअ-2026/प्र.क्र.09 / समन्वय-1 यांचेकडील दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजीचे शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 हे राबविणेत येणार आहे. यामध्ये महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकापर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अकृषीक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे, सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवीन तरतुद, तुकडेबंदी कायदयातील सुधारणा व अभिलेख अदयावतीकरण इत्यादी कामे या शिबिरामध्ये होणार आहेत.
सदर सुधारणेचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, महिला व विघार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी जावली तालुक्यातील प्रत्येक महसूली गावांमध्ये दिनांक 23/2/2026 ते 5/3/2026 या कालावधीमध्ये चावडी वाचन कार्यक्रम सुरू आहे. सदर चावडी वाचनामध्ये मयत खातेदार यांचे वारस नोंदी करणेकामी अर्ज स्विकारणे, सातबारावरील खातेदार यांचे नावापुढे असलेल्या एकत्र कुटुंब मॅनेजर व अज्ञान पालक कर्ता इत्यादी संज्ञा कमी करणे, सातबाराचे इतर अधिकारातील कालबाहय नोंदी कमी करणे, तगाई, बंडीग, इत्यादी बोजे कमी करणेकामी अर्ज स्विकारणेत येणार असून सदर शिबीरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेखाची दुरूस्ती करणे, लोकसेवा हक्क अधिनियम कायदा अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप करणे, अकृषीक तरतुदी संदर्भातील सुधारणाबाबत नागरीकांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत लाभ होईल या दृष्टीने कार्यवाही करणे, भूसंपादन केलेल्या व अकृषीक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तरी अंमल देणे, Ease of Doing Business सुधारणा व नागरी सुविधा उलब्ध करून देणे, ई मोजणी, अॅग्रीस्टॅग, पी एम किसान, बाबत जास्तीत जास्त लाभार्थी यांना लाभ होणेच्या दृष्टीने नियोजन करून कार्यवाही करणेत येणार आहे. सदर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणेकामी जावली तालुक्यामध्ये खालील प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 हे राबविणेत येणार आहे.
केळघर मंडळ मध्ये 7 मार्च 2026 रोजी भैरवनाथ मंदीर, हॉल केळघर येथे, बामणोली मंडळ येथे 14 मार्च 20256 रोजी भैरवनाथ मंदीर ग्रामपंचायत कार्यालय शेजारी,बामणोली येथे,अनेवाडी मंडळ येथे 10 एप्रिल 2026 रोजी ग्रामपचांयत कार्यालय, हॉल सायगांव येथे, कुडाळ मंडळ येथे 17 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हॉल कुडाळ येथे, मेढा मंडळ येथे 8 मे 2026 तहसिल कार्यालय जावली मेढा येथे,करहर मंडळ येथे 15 मे 2026 विठ्ठल रूक्मीनी मंदीर सभागृह, करहर याठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जावली तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हान उपविभागीय अधिकारी सातारा व तहसिलदार जावली यांनी केले आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 मध्ये वरील प्रमाणे नमुद तारेखेचे दिवशी आयोजीत करणेत येणा-या शिबीरांमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होवुन पात्र लाभार्थी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा’’
आशिष बारकुल,
उपविभागीय अधिकारी सातारा



