
स्टार ११ महाराष्ट्र
ओमप्रसाद सिंदकरची सैनिक स्कूलसाठी निवड; देशसेवेचे स्वप्न साकारणार
केळघर.दि.०२. अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE 2026-27) नुकतीच पार पडली असून, यात साताऱ्यातील ओमप्रसाद ओमकार सिंदकर याने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी घेतलेल्या या परीक्षेत ३०० पैकी २८८ गुण मिळवून देशात ६५ वा क्रमांक (Rank – 65) पटकावला आहे.
ओमप्रसादच्या या यशामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून,सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देशसेवा करण्याचे त्याचे व कुटुंबाचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने या परीक्षेचा सराव केला होता.त्याचे हे यश केवळ त्याचेच नसून त्याच्या कष्टाला मिळालेली पावती आहे,अशा भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.
सातारा येथील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सैनिक स्कूलमध्ये निवड होणे ही अभिमानाची बाब मानली जाते.ओमप्रसादच्या या यशाबद्दल त्याचे शिक्षक आणि नातेवाईकांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



