क्रीडामहाराष्ट्र

आशियाई क्रीडा स्पर्धेत एअर रायफल्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक

ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामागिरी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–

 

मुंबई.दि.२५. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे.

चीनमधील फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरूवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करीत, संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. रुद्रांक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू आहे. भारताने नेहमीच आशियाई क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे. यंदाच्या या स्पर्धेत सुरूवातच या तिघांनी नेमबाजीत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन केली आहे.

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!