स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——सुरेश पार्टे
” कबड्डी ” मैदानी खेळाची परंपरा बिभवी गांवाने कायम जोपासली …
वसंतराव मानकुमरे
मेढा .दि.२४.सध्या मैदानी खेळाचे महत्व कमी होत चालले असताना बिभवी गावाने “कबड्डी “मैदानी खेळाची परंपरा कायम जपली आहे. ही कौतुकाची बाब आहे .आरोग्य संपन्न जीवनासाठी मैदानी खेळाला महत्त्व दिले पाहिजे .असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केले.
बिभवी येथील श्री हनुमान क्रीडा मंडळाचे वतीने आयोजित केलेल्या कबड्डी सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी वसंतराव मानकुमरे बोलत होते .प्रारंभी त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले .याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक शामराव मर्ढेकर ,वे०णामाईअध्यक्ष सुरेश पार्टे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य मच्छिंद्र शिरसागर ,युवा नेते संदीप परमणे ,मोहनराव जगताप ,समीर आतार ,मंडळाचे अध्यक्ष एकनाथ देशमुख ,राजेंद्र जाधव ,महेश देशमुख उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना वसंतराव मानकुमरे पुढे म्हणाले आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्यामुळे बिभवी गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे .गट तट न करता प्रत्येकाने विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या गावचा विकास कसा होईल हे पाहिजे. असे सूचित करून सलग ४६ वर्ष कबड्डीचे सामने भरवणाऱ्या हनुमान क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे कौतुक केले.
ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंच्या क्रीडा कौशल्या चालना देण्याच्या पवित्र हेतूने श्री हनुमान क्रीडा मंडळ बिभवी तालुका जावली यांच्या वतीने गेले सलग ४६ वर्ष कबड्डी सामन्याची भव्य स्पर्धा आयोजित केल्या असून सदरच्या स्पर्धा दि. २३ व २४ डिसेंबर या दोन दिवसात संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी सातारा जिल्हा सह कोल्हापूर, सांगली ,पुणे ,पंढरपूर ,महाड, बारामती, डोरलेवाडी ,मुंबई ,पालघर या विभागातील एकूण ३५ संघानी सहभाग नोंदवले असल्याचे महेश देशमुख यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले .
या प्रसंगी प्रवीण देशमुख, दत्तात्रय बांदल ,जगन्नाथ बांदल ,तुकाराम नवले ,शशिकांत देशमुख ,विठ्ठल देशमुख ,रवींद्र देशमुख, यशवंत जाधव, सूर्यकांत माने ,सुभाष बर्गे त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व कार्यकर्ते ,पदाधिकारी ,ग्रामस्थ व खेळाडू उपस्थित होते .
कै.संपतराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली पांडूरंग देशमुख ( सर ) ,यांचे मार्गदर्शनाखाली सुरु केलेली ही स्पर्धा अद्याप अखंडपणे सुरू आहे .त्यास खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद मिळतो.