
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
केळघर, ता:१९: केळघर त.जावली.येथील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून केळघर विकास सेवा सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सोसायटीने काम करावे, सोसायटीस सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
फोटो ; केळघर विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील जांभळे यांचा सत्कार करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. समवेत रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार, तुकाराम पार्टे, संपत सुर्वे, शशिकांत शेलार अविनाश बिरामने आदी
केळघर विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील श्रीपती जांभळे (नाना) यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे . त्यानिमित्ताने नूतन अध्यक्ष श्री. जांभळे व केळघर सोसायटीच्या संचालक मंडळाने आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा येथील सुरुची या निवासस्थानी आज सदिच्छा भेट घेतली त्यावेळी नुतन अध्यक्ष जांभळे यांचा सत्कार करताना ते बोलत होते.
आमदार भोसले म्हणाले, नुतन अध्यक्ष सुनील जांभळे यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, जिल्हा बँकेच्या विविध आकर्षक योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सोसायटीने काम केले पाहिजे. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष जांभळे यांनी आमदार भोसले व जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष तुकाराम पार्टे, संचालक रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार,जगन्नाथ शेलार, संपत सुर्वे, पार्वती बेलोशे,लक्ष्मण जाधव शशिकांत शेलार, अविनाश बिरामणे आदींची उपस्थिती होती.