स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मुंबई. दि . २४. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार आपण गमावला आहे.
त्यांच्या निधनाने कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. ‘आनंद’ चित्रपटातील त्यांची भूमिका संस्मरणीय होती. त्यांनी एक मोठा कालखंड गाजवला. आज सीमाताई! ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या त्या साक्षीदार होत्या,त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांचे आपल्यातून निघून जाणे सिने जगतातील एका अध्यायाची अखेर आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत अनेक राजकीय ,सामाजिक ,कलावंतांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.