स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
सातारा.दि.१२.साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ. रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे शुक्रवार दि. 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सौ. रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते.
आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सौ.रजनीदेवी पाटील यांचा 26 जुलै 1948 रोजी जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून 16 मे 1968 रोजी त्यांचा खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला. खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकिय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम सोबत दिली.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.