महाराष्ट्रसातारासामाजिक

लोक सहभागा शिवाय गावे आदर्श होत नाहीत.

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – अभिजीत शिंगटे

मेढा.दि.१९. निसर्गाचे वरदान लाभलेले गाव, स्वच्छतेमुळे अधिकच सुंदर दिसते आहे. पण त्यासाठी ग्रामस्थांनी, महिलांनी आणि युवकांनी घेतलेले परिश्रम व ग्रामपंचायतीने सातत्यपूर्ण केलेली कामगिरी यामुळेच आपले गाव आदर्शवत ठरले असून लोक सहभागाशिवाय गावे आदर्श होत नाहीत असे प्रतिपादन दत्ताभाऊ काकडे यांनी केले.

सातारा येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे आले होते त्यावेळी त्यांनी अचानक मौजे जवळवाडी गावास भेट दिली .यावेळी सरपंच परिषदेचे राज्य विश्वस्त आनंदराव जाधव,सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरूण कापसे, शत्रुघ्न धनावडे,जकातवाडीचे आदर्श सरपंच चंद्रकांत सणस,जावली तालुका अध्यक्ष पुंडलिक पार्टे, सचिन दळवी व मोठ्या संख्येने जावली तालुक्यातील सरपंच,उपसरपंच उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की गावाने अशीच एकजुटीने सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवली तर राळेगणसिध्दी- हिवरेबाजार सारखा लौकीक आपल्याही गावाला प्राप्त होईल ,आम्ही आज अचानक आलो आहोत परत या गावात येवू तेव्हां काहीतरी देण्यासाठीच येवू असे सांगून सर्वांची मने जिंकली.

जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.सुरेखा मर्ढेकर यांनी काकडे यांचे स्वागत केले यावेळी लोकनियुक्त मा.सरपंच सौ.वर्षाताई जवळ,उपसरपंच शंकरराव जवळ व गावातील ग्रामस्थ,महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलासबाबा जवळ यांनी व सुत्रसंचालन सतिष मर्ढेकर यांनी केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!