जिवाची पर्वा न करता दागिणे चोरणाऱ्यास पकडून दिल्याबद्दल दर्शन जुनगरी याचा केला सन्मान

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई.दि.१९.ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी व मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.श्री.अविनाश सकुंडे यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या सूचनेनुसार आज दि.19/5/2022 रोजी वडाळा मुंबई येथील शिवसेना शाखा क्रमांक १८४ चा गटप्रमुख,ब्लॅक स्टार स्पोर्ट्स क्लब चा सदस्य कु.दर्शन जुनगरी याने आज दुपारी दादर पारशी कॉलनी या ठिकाणी महिलांच्या अंगावरचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः जखमी होऊन ही पकडून पोलिसांकडे सुपूर्द केले, दर्शन च्या या कामगिरीला मनःपूर्वक सलाम करून त्याच्या हिमतीने कौतुक करण्यासाठी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी व मानवाधिकार संघटनेच्या वतीने त्याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
त्याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.अमोल वंजारे,महिला महाराष्ट्र सचिव सौं.ज्योतीताई भोसले,मुंबई अध्यक्षा सौं.वसुधा वाळुंज,मुंबई सचिव श्री.हितेश गायकवाड,मुबंई सहसचिव श्री.लितेश केळकर,मुंबई सहसचिव श्री.दत्तराज आंब्रे, युवासेनेचे श्री.साहिल चिंदरकर,श्री.दर्शन जुनगरी,श्री.संतोष जुनगरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



