धार्मिकसामाजिक

केळघर मध्ये गेल्या१५ वर्षा पासून श्री साईनाथ मित्र मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम

केळघर, ता:७ जावली तालुक्यात गेल्या १५ वर्षांपासून ओम श्री साईनाथ मित्र मंडळ यांच्यावतीने केळघर येथे विविध सामाजिक उपक्रम राबिवले जातात.

ओम श्री साईनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धनावडे यांच्या हस्ते साई प्रतिमेचे पूजन करून साई दिंडीस मंगळवार १ फेब्रुवारी ते शनिवार ५ फेब्रुवारी पर्यंत हा दिंडी सोहळा केळघर पासून शिर्डी पर्यंत सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातून साईंची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

धार्मिक परंपरा जपण्याचे काम या मंडळाकडून होत आहे. तसेच केळघरच्या पाणीप्रश्नासाठी या मंडळाचे अध्यक्ष उद्योजक राजेंद्र धनावडे यांनी स्वखर्चाने बंधारे बांधत आहेत. त्यांचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी आज केळघर येथे ओम श्री साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित साई पालखीच्या भंडारा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमित कदम, योगेश गोळे, बुवासाहेब पिसाळ, सुनील देशमुख, राम कदम, , नारायण शिंगटे, पत्रकार सुरेश पार्टे,केळघर चे सरपंच रवींद्र सल्लक,मनोहर शिर्के,साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धनावडे, जगन्नाथ पार्टे,संजय पार्टे, बाजीराव धनावडे, आतिष कदम,संकेत पाटील, इम्रान आत्तार,राजेश बेलोशे,बापू दळवी,शांताराम बेलोशे, आदींची उपस्थिती होती.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, केळघर विभागात अध्यात्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी साईनाथ मित्र मंडळ सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. उद्योजक राजेंद्र धनावडे व बाजीराव धनावडे हे सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांना सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी केळघर विभागातील साई भक्त भाविक उपस्थित होते .


दरम्यान ओम श्री साईनाथ मित्र मंडळाच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, शांताराम पार्टे,मोहनराव कासुर्डे,चेअरमन बबनराव बेलोशे प्रवीण महाराज शेलार,सुनील जांभळे, सागर धनावडे,यांनीही साई भंडाऱ्याला सदिच्छा भेट देऊन साई पालखीचे दर्शन घेतले. राजेंद्र धनावडे यांनी उपस्थितांचे सर्वांचे स्वागत केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!