मेढा शहरात अतिवृष्टीची पाहणी; नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत कायमस्वरूपी उपाययोजनांचे दिले निर्देश
स्टार ११महाराष्ट्र
मेढा | प्रतिनिधी दि.०८. सार्वजनिक बांधकाममंत्री महाराष्ट्र राज्य श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली,मेढा शहरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी शहराच्या विविध प्रभागांत पाहणी केली.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर, घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, नागरिकांना धीर देत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

शहरातील ज्या भागांत पाणी साचून राहिले होते, तिथे आरोग्य व स्वच्छता सभापती नितीन मगरे यांनी स्वतः लक्ष घातले. त्यांनी सकाळी लवकर स्वच्छता कर्मचारी आणि JCB च्या सहाय्याने पाणी निचरा करण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या.

भविष्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होईल, अशा स्वरूपाच्या सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी नगराध्यक्षा रूपाली वारागडे, उपनगराध्यक्ष विकासजी देशपांडे ,आरोग्य सभापती नितीन मगरे,महिला बालकल्याण सभापती आनंदी कारंजेकर,नगरसेविका तेजस्वीनी इगावे,नगरसेवक शिवाजी गोरे,नगरसेवक सुशांत कांबळे,नगरसेवक धनंजय पवार.मान्यवर उपस्थित होते.
या दौऱ्यात मेढा नगरपंचायत कर्मचारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



