स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – मोहन जगताप (सातारा)
सातारा. दि.२८. जिल्ह्यातील नागरिकांचे वापरातील मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले असतानाच त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सायबर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकडे आदेशित करून सायबर पोलीस ठाण्या मार्फत गहाळ व चोरटय़ांनी चोरलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे मूळ मालकांचा शोध घेवून त्यांना ते मोबाइल परत करण्यासाठी तशा सूचना वरिष्ठ अधिकारी यांनी दिल्या होत्या.
त्या सूचनांचे साइबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचार्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सायबर पोलीस दल सातारा यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अजय जाधव, अमित झेंडे, यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करून जिल्ह्यातून गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी मागील एक महिन्यापासूनच तांत्रिकदृष्ट्या माहितीचे तंत्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करून त्यांच्या या परिश्रमातून तब्बल 13,00,000 तेरा लाख किमतीचे 82 मोबाईल ताब्यात घेण्यात यश आले. 
सातारा येथील पोलीस कार्यालयात गहाळ व चोरीला गेलेल्या लोकांच्या सर्व कागद पत्राची पडताळणी करून व ओळख पटवून पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सायबर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सर्व अंमलदार यांच्या उपस्थितीत गहाळ व चोरी झालेल्या मोबाईलचे मूळ मालकांना परत देण्यात आल्याने गेलेले मोबाईल परत मिळाल्याने संबधित सर्व जणांच्या चेहर्यावरील आनंद दिसत होता.
यावेळी सायबर ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक बंसल यांनी करून त्या अधिकार्यांचे कर्मचारी यांचे अभिनंदन केले..यापुढेही जनतेने दक्षता घेवून विसरभोळे पनाने अगर चोरी होवू नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन करून यापुढेही अशा पद्धतीने लोकांच्या लोकाभिमुख कार्यासाठी सायबर पोलीस सक्षमपणे उभे राहील..
या कामगिरीबद्दल सहकार्याच्या भावनेतून सहभागी झालेल्या पोलीस निरीक्षक सुनील शेळके, पोलीस अंमलदार अजय जाधव ,अमित झेंडे,महेश शेटे, शंकर सावंत, सचिन पवार,संदीप पाटील, वर्षा खाचे, रेश्मा चव्हाण, ज्योती कोंडावळे शिंदे, यशोमती काकडे, प्रविण अहिरे, सुशांत कदम,महेश पवार व यशवंतराव घाडगे या तरबेज पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी कौतुक करून अभिनंदनही केले



