जावली पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहिर तालुक्यात राजकिय वर्तुळे फिरायला आजपासून सुरवात

स्टार ११ महाराष्ट्र न्युज अभिजित शिंगटे
मेढा. दि.२८. पंचायत समिती जावली येथे पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. 
मेढा येथील पंचायत समिती सभागृहात विजया यादव उपजिल्हाधिकारी निवडणूक रोजगार हमी योजना नियंत्रण निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तहसिलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी आर. डी.काळे यांचे उपस्थितीत आरक्षण जाहिर करण्यात आले असून पुढीप्रमाणे आहेत
१)खर्शीबारामुरे गण – सर्वसाधारण स्त्री
२)म्हसवे गण – नागरीकांचा मागास प्रवर्ग
३)कुडाळ गण – सर्वसाधारण स्त्री
४)सायगाव गण-सर्वसाधारण
५)आंबेघर तर्फ मेढा गण – सर्वसाधारण
६)कुसुंबी गण – सर्वसाधारण स्त्री
या प्रमाणे एकूण सहा गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.जावली पंचायत समिती सभागृहात आयोजित या आरक्षण सोडतीमध्ये आरक्षण कसे होणार याची नागरिकांना उत्सुकता होती त्यानुसार हे आरक्षण चिठ्ठी पद्धतीने उपस्थित असणारी कु.स्वरा अतुल सपकाळ हिच्या मदतीने सोडविण्यात आला.या चिठ्ठी नुसार आंबेघर तर्फ मेढा,कुसुंबी,खर्शी-बारामुरे, म्हसवे या गणात आरक्षण जाहीर करण्यात आले .
या आरक्षण सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते .या वेळी जावली विभागातील इच्छूक उमेदवार तसेच मेढा , कुसुंबि,कुडाळ , सायगाव,या भागातील नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या मनातील भावना व्यक्त करून निवडणूक चुरशीची होणार सांगितल्याने आत्ता पासून या राजकीय आखाड्याला सुरवात झाल्याचे आढळून आले.



