
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भणंग. दि.२७ सालाबादप्रमाणे जावळीची राजधानी मेढा येथील श्री विठ्ठल मंदीरातुन विश्वंभर बाबा आषाढी दिंडी पायी सोहळा मेढा विभागाचा मोठ्या उत्साहात पार पडला. विश्वंभर बाबा आषाढी पायी दिंडी सोहळा जावळी मेढा विभागाची दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रं.167 रथाचे मागे असते खऱ्या अर्थाने विणा उतरवणी सोहळा संपन्न झाले शिवाय दिंडी सोहळा पूर्ण होत नाही मंगळवार दि २६ जुलै रोजी श्री विठ्ठल मंदीर मेढा येथे हा दिंडी सोहळा विणा उतरवणी कार्यक्रम संपन्न झाला विणा उतरणी कार्यक्रमात ह भ प प्रकाश महाराज कदम यांची मंत्रमुग्ध करणारी किर्तन सेवा पार पडली.
सदर कार्यक्रमात आदरणीय सुनील मारूती जवळ राजमुद्रा एक्सप्रेस जवळवाडी यांचे तर्फे अन्नदानाचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ मंदिरात संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा.सभापती जयश्रीताई गिरी हजर होत्या अध्यक्ष नारायण श्रीपती धनावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले दिंडी प्रमुख ह भ प अतुल महाराज देशमुख यांनी आभार मानले सदर कार्यक्रमास तुकाराम देशमुख ,चोपदार चंद्रकांत जवळ , विणेकरी शिवराम मोरे ,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सचिव सुनिल आण्णा धनावडे , सरपंच परिषद जिल्हाउपाध्यक्ष बजरंग चौधरी विशाल रेळेकर सि एम न्युज नेटवर्क चे चव्हाण साहेब पत्रकार शिंगटे गुरुजी मेढा नगरीचे ग्रामस्थ राधीका भजन मंडळ मेढा जवळवाडी गांजे मामुर्डी मोरावळे बिभवी इतर गावचे ग्रामस्थ उपस्थीत होते.



