महाराष्ट्रसातारासामाजिक

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेस सुरुवात

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


मेढा.दि.१५. मागील दोन वर्ष रखडलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेची पहिली यादी जाहीर झाली. त्यामुळे शेतकरी ऐन दिवळीचे तोंडावर सुखावला.

जावळी तालुक्यात आधार प्रमाणीकरणाचे काम चालु झाले बद्दल शेतकर्यानी शासनाचे धन्यवाद मानले शासनाने सहकार खाते,जिल्हा बैक , व सोसायटी यांचे सहकार्याने केलेल्या मोफत आधार प्रमाणीकरण मोहीमेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे ५००००/- अनुदान यादीतील सभासदांनी आधार प्रमाणीकरण करणेसाठी मेढासेंटर सोसायटी मध्ये गर्दी केली होती जिल्हा बैकेच्या मेढा व भणंग शाखेतील सोसायट्या मेढा सेंटर, मामुर्डी, करंजे, बिभवी, भणंग, ओझरे सासायटीचे सभासदांनी मेढासेंटर सोसायटीत प्रमाणीकरण केले सर्व सभासदांचे चेहर्‍यावर दिवाळी आनंदात जाणार असेच भाव दिसत होते.

त्याप्रसंगी मेढासेंटर सोसायटीचे चेअरमन श्री सुरेश दळवी ,सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे विकास अधिकारी मा डि के दुर्गावळे , एस व्ही पवार सचिव सुनिल आण्णा धनावडे तसेच मेढा सेंटर, मामुर्डी, करंजे, बिभवी, भणंग, ओझरे सासायटीचे सभासद उपस्थीत होते

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!