जिल्हाधिकारी सातारा

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः चिखलात उतरून केली भात लागवड

स्टार ११महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात एक दिवस बळीराजासाठी उपक्रम संपन्न;

केळघर दि.२३.  सातारा जिल्ह्यात शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतःबाहुळे तालुका जावली येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन चार सूत्रांनी भात लागवड केली.


संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून चिखल करत भाताची लावणी केली. विशेष म्हणजे, पाटील यांनी स्वतः शेतावर रोटर चालवून चिखल करत प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि उपक्रमातील बळीराजाशी नाळ जोडणारा उद्देश सार्थ ठरवला.उपस्थित शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला या वेळी त्यांनी शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता, खते,जलसिंचनाच्या सोयी,तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि शासकीय योजनांचा लाभ यांसारख्या विविध अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या.शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिले.


या विशेष मोहिमेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे,जावली तहसीलदार प्रविण मुद्गुल त्यांनीही शेतात प्रत्यक्ष उतरून भात लागवड करत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून बळीराजाला बळ दिले. या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी केले होते,ज्याचे शेतकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.

“या पद्धतीमुळे भाताचे उत्पन्न वाढण्यास आणि खर्चात बचत होण्यास मदत होते. जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांनी स्वतः लागवड केल्यामुळे या तंत्रज्ञानाचा प्रचार अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.”

तहसिलदार प्रविण मुद्गुल

यावेळी जावली तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड,शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे,मंडल कृषी अधिकारी संतोष भोसले उपकृषी अधिकारी बापूसाहेब रुपनवर,संदीप ढाकणे,प्रसाद फडतरे,दत्तात्रय जाधव उपस्थित होते.

“जेव्हा सनदी अधिकारी स्वतः शेतात उतरून चिखलात पाऊल ठेवतात, तेव्हा ते केवळ भाताची लावण करत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि शेती व्यवसायाचा सन्मान करत असतात.”
— एकनाथ ओंबळे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!