लोकनृत्य स्पर्धेत मेढा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश लोकनृत्य स्पर्धात जिल्हयात प्रथम क्रमांक

मेढा. दि.१९.जावळी तालुका हा शैक्षणिक गुणवत्ता व विविध उपक्रमांत नेहमीच अग्रेसर आहे .२०२२-२३ च्या लोकसंख्या शिक्षण प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या मेढा शाळेने प्रथम क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम राखली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२२ -२३ अंतर्गत लोकनृत्य स्पर्धांचे आयोजन केले होते.या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या मेढा शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करीत यश मिळवले.या स्पर्धेत मेढा शाळा प्रथमच सहभागी झाली होती.सहभागी विद्यार्थी शुभम गोरे, सागर ढेबे, तनिष्का गायकवाड, सिद्धी शेलार, ईश्वरी शेलार, भूमिका मर्ढेकर यांनी उत्तम कला सादरीकरण केली.
विशाल बेंद्रे आणि स्नेहल चिकणे यांनी नृत्य सादरीकरणास सहकार्य केले. सौ. अनुपमा दाभाडे, सौ. शिल्पा कारंजकर व सौ. पूनम कदम या शिक्षकांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. मेढा शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचे या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत कर्णे, विस्तारअधिकारी कल्पना तोडरमल,केंद्रप्रमुख.अलका संकपाळ .शाळा व्यवस्थापन समिती, पत्रकार आणि ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.



