आरोग्य विषयीमहाराष्ट्रसातारासामाजिक

मेढा नगरपंचायत आणि लायन्स नॅब आय हॉस्पिटल सातारा यांचे संयुक्तविद्यमानेे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क —-


मेढा.दि.१६. मेढा नगरपंचायत आणि लायन्स नॅब आय हॉस्पिटल सातारा यांचे संयुक्तविद्यमानेे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेढा नगरपंचायतिचे मुख्याधिकारी अमोल पवार यांनी दिली.


१७ऑक्टोबर २०२२ रोजी सोमवारी या शिबिराचे आयोजन सकाळी ०९ :०० ते दुपारी ०१ :०० या वेळेत
मेढा येथील भैरवनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे तसेच अल्प दरात चष्मे वाटप आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.


तरी मेढा आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मेढा नगर पंचायतीने आणि
लायन्स नॅब आय हॉस्पिटल सातारा यांनी केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!