महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईशैक्षणिकसातारासामाजिक

जि.प.प्राथमिक शाळा केळघर व जावलीतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षकांचा प्रयत्न

स्टार११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ

केळघर. दि.१९.दिवाळी हा सण भारतासह संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो.आकर्षक पणत्या,कंदील,उटणे,सजावटीच्या विविध वस्तू यांनी दीपावलीचा उत्साह,आनंद द्विगुणीत करीत असतो .
दिवाळी हा सर्वांच्या आवडीचा सण आहे. या कालावधीत मोठ्या उत्साहात नागरिक दिवाळीच्या सणामध्ये सहभागी होतात. बाजारपेठांमध्येही मोठी उलाढाल होते.

दिवाळीच्या सणानिमित्त आकाशदिवे आणि पणत्यांना विशेष महत्व असते.यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळघर येथे जावलीतील दिव्यांग विदयार्थी व केळघर शाळेने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीला वाव देण्याचे काम केले.वस्तू तयार करण्यासाठी जि. प. प्राथमिक शाळा केळघर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, अपंग समावेशित विभागाच्या सौ.बाबर मॅडम,सौ.जगताप मॅडम व श्री.चव्हाण सर सौ.धनावडे,सौ.केसरकर,सौ. खाडे,सौ.भोसले,श्री.सुर्वे,श्री.जुनघरे उपस्थित होते.

जावलीतील दिव्यांग विदयार्थी व केळघर शाळेतील विदयार्थी यांच्या मदतीने विविध प्रकारचे कंदील,आकर्षक पणत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळघर येथे जावलीतील दिव्यांग विदयार्थी व केळघर शाळेतील विद्यार्थ्यांनी कारागिराप्रमाणे सुरेख अशा पणत्यांची निर्मिती केली. या वस्तू बाजारात विक्री करणार आहेत. पणत्या आणि आकाशदिवे तयार करण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.शाळेतील विद्यार्थी १८ वर्षाचे झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे रहावे, यासाठी बालवयातच त्यांच्यातील कौशल्य व कलागुणांना चालना देण्याचा प्रयत्न आहे.


पंचायत समिती जावली येथे जि.प प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन करण्यात आले, आणि मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.तसेच मोठया प्रमाणावर वस्तूंची विक्रीही झाली.

या प्रदर्शनाला माजी शिक्षण सभापती अमितदादा कदम,गटविकास अधिकारी श्री.रमेश काळे गटशिक्षणाधिकारी श्री.कर्णे,विस्तार अधिकारी सौ.तोडरमल,केंद्रप्रमुख श्री हंबीरराव जगताप,इ.शिक्षक वर्ग यांनी भेट दिली विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!