महाराष्ट्रसातारासामाजिक

रोपट्याच वटवृक्षात रूपांतर करा… धनंजय जांभळे पावशेवाडीत कोयना लेक पर्यटन संस्थेचा शुभारंभ…


कास ता. १९. आज कोयना लेक पर्यटन सहकारी संस्थेच्या रूपाने पर्यटन वाढीसाठी छोटस रोपट लावले असून पर्यटकांना चांगल्या सुविधा देवून संस्था नावारूपास आणून त्याचे वटवृक्षात रूपांतर करा असे आवाहन सातारा नगरपालिकेचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी केले.

कोयना भागातील पावशेवाडी (बामणोली) येथे कोयना लेक पर्यटन सहकारी संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास सिताराम भोसले, सावळाराम आगुंडे, किशोर शिंदे, एल. टी पवार, टि. एस. पवार, अंकुश पवार, आनंद जाधव, दिपक पवार, भरत पवार, राजू पवार, शंकर कृष्णा पवार, आनंद पांडुरंग पवार, सचिन पवार, रविंद्र पवार, अंकुश पवार, प्रकाश पवार, प्रकाश डिगे, तानाजी पवार, योगेश जाधव, राहुल जाधव, लक्ष्मण डिगे, श्रीरंग पवार, धोंडीबा पवार, राजू सिताराम पवार, विठ्ठल जाधव, अमोल डिगे, सुरेश सखाराम पवार, शिवराम शिंदे, बाळू शिंदे, अशोक सावळा पवार, विकास पवार आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. जांभळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा. संस्थेच्या माध्यमातून बोट क्लब चालवताना सर्वसामान्य लोकांना आर्थिक प्रगतीची दारे उघडी करा. पर्यटन वाढीसाठी हा बोट क्लब एक उत्तम पर्याय ठरेल.


संस्थेच्या आजच्या उद्घाटनप्रसंगी पुण्याहून आलेले राजेंद्र साळवी व त्यांचे सहकारी हे पहिले ग्राहक ठरले. त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करून बोटीची पहिली फेरी त्रिवेणी संगमापर्यंत मारण्यात आली. यावेळी साळवी यांनी सहकाऱ्यांसह कायम येत राहू असे सांगितले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!