वेण्णानदीपात्र व सार्वजनिक विहीरीच्या परीसरातील स्वच्छता करत सावलीकरांच्या शेकडो हातांनी राबून पवित्र जलपुजनाने नाताळ सण केला साजरा


मेढा.दि .२९ स्वच्छतेचा जागर करत वेण्णानदीपात्र व सार्वजनिक विहीरीच्या परीसरातील स्वच्छता सावलीकरांच्या शेकडो हातांनी राबून पवित्र जलपुजनाने नाताळ सण साजरा केला .श्रमदान आणि श्रमभोजन करत नववर्षामध्ये एक नवविकासाच्या क्रांतीची पहाट विकासात्मक करण्यासाठी अवघट बिकट असलेली श्रमदान ठिकाणी जाणारी वाट चोखंदळत आज सर्वांपुढे सावलीकरांनी आदर्श ठेवला . त्यामुळे समस्त सावलीकरांचे या उपक्रमाबद्दल परीसरातील गावांमध्ये कौतुक होत आहे.

स्वच्छ आणि सुंदर आमची सावली या उपक्रमाने प्रेरीत होवून १०० पेक्षा अधिक ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहीले . सकाळी साठे आठ वाजता श्रमदानाला सुरुवात झाली . मात्र नदीपात्र आणि सार्वजनिक विहीर परीसराकडे जाणारा रस्ता एका बाजुला जलमय होता, तर दुसन्या बाजुला घसरणारी , तुटलेली वाट आणि झाडी झुडपानी वेढलेली वाट चोखंदळत सर्वजन वेण्णानदी पात्र व सार्वजनिक परिसरात आले . स्वच्छतेचा जागर करत शेकडो हात राबून बघता बघता विहीरीचा परीसर अन वेण्णा नदीपात्र स्वच्छ आणि सुंदर झाले.

जानेवारी आला की सावलीची डोंगरातून सुरु असलेली गुरुत्वाकर्षण नळपाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा कमी कमी होतो . त्यामुळे अचानक पाणी पुरवठा बंद होवू नये म्हणून अगोदरच ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच विजय सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच बाबुराव भिलारे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा रामचंद्र जुनघरे, सुरेश ईश्वर कांबळे, आनंदी प्रकाश जुनघरे, , वनिता संदीप म्हस्कर, रूपाली विजय जुनघरे, निर्मला नथुराम जुनघरे ग्रामसेविका ए. पी कुंभार व कर्मचारी रविंद्र जुनघरे यांनी आवाहन केले . यासाठी नाताळ ही सार्वजनिक सुट्टी श्रमदानाने साजरी करण्याचे आठ दिवसापुर्वी ग्रामपंचायतीच्यावतीने जाहीर केले . त्याची जागृती प्रचार व प्रसार केला.
यास उदंड प्रतिसाद मिळत आज एक स्वच्छतेच्या विकासाच पाउल पडल . स्वच्छता असे तेथे लक्ष्मी वसे या म्हणीप्रमाणे स्वछतेकडून समृद्धीकडे सावली गावांने आज वाटचाल सुरु केली .स्वच्छ आणि सुंदर आमची सावली गावचा विकास हाच आमचा ध्यास हेच सर्व ग्रामस्थांनी आपल्या एकजुटीतून दाखवून दिले.श्रमदानानंतर वेण्णानदी व विहीरीतील जलपुजन विधीवत पद्धतीने ग्रामदैवत काळेश्वरीचे मानाचे पुजारी संतोषस्वामी जंगम यांनी ग्रामपंचायत सदस्य ह भ प आनंदा जुनघरे, अजिंक्य नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, राजश्री शाहू नगरचे मार्गदर्शक मोहनराव कांबळे, ह भ प .शंकरराव भिलारे व ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र जुनघरे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले . यानंतर उपस्थित सर्व महिलांनी हळदी कुंकु वाहून पुजन केले . यानंतर वेण्णामाईची व विहीरीची ओटी भरली . त्यानंतर जलदेवतेची आरती नैवद्य व महाप्रसाद झाला.
यावेळी माजी सरपंच दुर्योधन जुनघरे, पोलिसपाटील संजय कांबळे,युवानेते व समाजसेवक प्रशांत जुनघरे,मंडळाचे उपाध्यक्ष सुशांत जुनघरे, सुरेश मोरे, माजी अध्यक्ष जगन्नाथ जुनघरे, अरविंद म्हस्कर, प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पप्पू मोरे , डॉ प्रा . निलेश जुनघरे, नारायण जुनघरे , बजीरंग म्हस्कर, माजी सरपंच भारती जुनघरे, अविनाश धनावडे, आचारी गहिणे आदी उपस्थित होते, विजय जुनघरे यांनी श्रमदानासाठी आपला स्वताचा टॅक्टर जलप्रवासातून बिकट वाट काढून उपलब्ध करून विशेष योगदान दिल्याबदल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले .

गावचा विकास हाच सर्वांगीण विकास करण्यासाठी गावचं आरोग्य व मुबलक शुद्ध पाणी याला अन्ययसाधारण महत्व असतं . तोच स्रोत्र बळकट करण्यासाठी स्वच्छतेचा विकास हेच आमचं श्रमसंस्कार आसून त्याचा आज प्रचंड आरंभ झाला . ही विकासाची नांदी असून भौतिक विकासापेक्षाही स्वच्छतेचा विकास मानवी जीवनात महत्वपुर्ण आहे.



