महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

रांगोळी प्रदर्शनाने दिले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन… मुख्याध्यापिका वैशाली कदम

सातारा दि.१३ सातारा जिल्ह्य़ातील चित्रकारांनी नव्यानेच स्थापन केलेल्या संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेतील रांगोळी प्रदर्शन पाहणी दरम्यान जावली ता.महाबळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भेटी प्रसंगी पुढे कदम म्हणाल्या की ग्रामीण जीवनात विद्यार्थ्यांना खडतर पणे शिक्षण घ्यावे लागते आज कलाकारांनी युवा कलावंत घडण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच विद्यार्थ्यांना कलेविषयी माहिती देवून त्यांच्या कलागुणांचा कलाविष्कार सादर करण्याचे प्रोत्साहन मिळाले.

डोंगरदऱ्यातील विद्यार्थी हा शिस्तप्रिय असल्याने त्यांच्या मातीशी असलेल्या ऋणानुबंध निर्माण करून आज कले बरोबरच सहाशी कसरतीच्या बळावर विद्यार्थी घडण्यासाठी सर्व समाजातील घटकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देवून विद्यार्थ्यांतील कलावंत घडण्यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी पुढाकार घेण्याची गरज़ असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी सातारा जिल्ह्यातील कलाकार संघटनेच्या वतीने पंकज कणसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जावली हरोशि व वाडा कुंभरोशी सोंडपार या ग्रामीण विभागातील विद्यार्थ्याच्या काठी कसरत व मातीतील निर्माण होणार्‍या कलागुणांचे कौतुक करून भविष्यात शहरातील विद्यार्थ्यांनासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन विभागवार विविध सहाशी व कलाविषयक प्रदर्शन भरविण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी उपस्थित यादव सरांचे व सहकार्‍यांचे उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रारंभी चित्रकार मोहन जगताप यांनी संस्थेच्यावतीने विविध कलेबाबत माहिती देवून बौद्धिककौशल्य वाढीसाठी प्रयत्न करून विद्यार्थी घडविण्यास कटिबद्ध असल्याची माहिती दिली. गणेश आर्ट यांनी स्वागत केले. तर चैतन्य जाधव यांनी आभार मानले

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!