
मेढा.दि.०७ मराठी पत्रकारितेचा पाया भक्मपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पूर्वीच्या काळी मत मांडायचा अधिकार नव्हता त्या काळात बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण मधून समाज प्रबोधन केले.

पत्रकारांनी पत्रकारितेच्या माध्यमातून बाजू मांडताना ती सर्वसमावेशक असावी बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी समाजातील घडलेल्या सर्व घटनांचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी दर्पण या मराठी वर्तमानपत्राची निर्मिती केली व सुधारकांनी पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून नवीन जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमातून रुजवली त्या परंपरेचा पाया बाळकृष्ण जांभेकर यांनी घातला.

जावळीची राजधानी येथे सालाबादप्रमाणे मेढा पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने साहेब यांचे हस्ते जावळीतील सर्व पत्रकारांचा सन्मान करणेत आला तसेच केळघर येथे बोंडारवाडी कृती समीतीच्या वतीने वैभव ओंबळे आदिनाथ ओंबळे इतरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करणेत आला तहसील कार्यालयाच्या वतीने राऊत साहेब नायब तहसीलदार संजय बैलकर साहेब यांचे हस्ते सन्मान करणेत आला पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी रमेश काळे साहेब यांचे हस्ते सर्व पत्रकारांचा सन्मान करणेत आला कार्यक्रमाची सांगता विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्थेत झाली गुरुवर्य ह भ प अतुल महाराज देशमुख यांचे हस्ते सर्व पत्रकारांचा सन्मान करणेत आला सांप्रदायीक संस्थेतर्फे झालेल्या सन्मानाने सर्व पत्रकार भावूक झाले होते.
कोणत्याही राजकीय पक्षाने पत्रकारांचा सन्मान केला नाही त्यामुळे सर्व पत्रकारांनी खंत व्यक्त केली



