जावली तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा श्री व सौ तोडकर यांच्यावतीने सत्कार


मेढा.दि .२०.जिद्द, चिकाटी ,प्रचंड मेहनत घेऊन जावलीच्या शिष्यवृत्ती पँटर्नचा लौकिक वाढवणार्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक करून त्यांच्याप्रमाणे इतरांनी प्रेरणा घ्यावी म्हणून प्रोत्साहन देणेसाठी शिक्षक बँकेचे माजी संचालक श्री गणेश तोडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटून गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्कार केले .यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व पेन तर मार्गदर्शक शिक्षकांना सन्मान चिन्हासह शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
केंद्रशाळा कुडाळ येथे कुडाळ,महू,पार्टेवाडी,आंबेघर,भोगवली आलेवाडी या शाळांचा तर, केंद्रशाळा मेढा येथे मेढा,ओझरे सावली,केळघर,वरोशी,पावशेवाडी या शाळांचा गौरव करणेत आला.यावेळी प्रत्यक्ष वाटपावेळी माजी जिल्हाध्यक्ष श्री मच्छींद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली माजी संचालक श्री गणेश तोडकर ,संचालक श्री विजय शिर्के,श्री,शंकर बिरामणे कोषाध्यक्ष श्री रामचंद्र भिलारे,श्री धैर्यशिल भोसले,श्री युवराज कुडाळकर,श्री संभाजी देशमुख,श्री योगेश शेलार,श्री सुनिल धनावडे,श्री हणमंतराव धनावडे,श्री आनंदा शेलार,श्री विनायक करंजेकर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी कुडाळ शाळेतील मुख्याध्यापक सौ जयश्री गायकवाड मँडम व मेढा शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश शेलार सर यांनी खूप सहकार्य केले.विभागवार प्रत्यक्ष भेटण्यासाठी अगोदर फोनवरून कल्पना देवून अचूक नियोजन करणेत आले होते.शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सघर्षासोबत त्यांचा गुणगौरव, कौतुक करण्यासाठीही श्री व सौ तोडकर कुटुंबिय नेहमीच पुढे असतात.या उपक्रमाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.



