मेढा.दि.२८.चांगले प्राध्यापक चांगले विद्यार्थी घडवतात तर चांगले विद्यार्थी चांगले प्राध्यापक घडवतात . प्राध्यापकांनी आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहीले पाहीजे तरच जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करता येईल. प्रा. भगवानराव पाटील यांचे काम मी जवळून पाहील आहे. हाडाचा प्राध्यापक कसा असावा तर ह्यांच्या सारखा. आजच्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये त्यांच्या गौरव अंकाच प्रकाशन करण्यात आले . ही त्याच्या कार्याची पोचपावती आहे . असे गौरवोद्गार प्राचार्य मा. के . यादव यांनी आपल्या भाषणात बोलताना काढले.
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभाग आयोजीत माजी विद्यार्थी मेळावा आणि मराठी विभाग विकास .व मराठी भाषा संवर्धन .. आपली जबाबदारी या विषयावर परिसंवाद तसेच गुरुवर्य प्रा. बी. डी. पाटील ” प्रेरणास्तंभ ” या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन प्राचार्य मा. के. यादव यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
या प्रसंगी रयत संस्थेचे सहसचिव शिवलिंग मेनकुदळे , प्राचार्य श्रीधर हेरवाडे , प्राचार्य माने, प्रा. बी .डी. पाटील , प्रा. डॉ. बाबुराव उपाधे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. उत्तमराव सुर्यवंशी., प्रा . नलिनी महाडीक, प्रा. मानसी लाटकर, प्रा. मीरा देठे , प्रा. निकम मॅडम, प्रा. ए. वाय . यादव ,प्रा. सुभाष बागवडे, प्रा .आर .एस्. यादव, प्रा. मेनसे सर, प्रा. सुमन निकम, प्रा. विश्वजीत जाधव, प्रा. पोपट काटकर.आदी गुरुवर्य मान्यवर मंडळी उपस्थीत होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अनेक हस्ती होवून गेल्या त्यामध्ये प्रा. भगवानराव पाटील यांचा समावेश आहे. कर्मवीर आ०णांनी संस्था उभी केली म्हणून माझ्या सह तुमच्यासारखी सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलं शिकत गेली . शिकत आहेत. आ०णांच्या विचाराची, संस्काराची शिदोरी असीच तेवत राहीली पाहीजे. विज्ञानाबरोबर माणूसकीही स्विकारली पाहीजे. शद्बाने माणसे जोडता येतात तर शब्दच माणसे तोडतात. त्यामुळे शद्ब महत्वाचे आहे. असे त्यांनी सुचित केले.
यावेळी रयत संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. शिवलींग मेनकुदळे म्हणाले , मराठी साहित्य क्षेत्रामध्ये ” प्रेरणास्तंभ ” या ग्रंथाच्या निर्मिती मुळे चांगली पिढी निर्माण . होण्यास प्रेरणा मिळत राहील. प्रा . पाटील सरांचे बरोबर काम करण्याची संधी मिळाली हे मी माझ भाग्य समजतो. असे सुचित केले. तर प्रा. माने सर बोलताना म्हणाले शिवाजी कॉलेजची समृध्द परंपरा प्रा. डॉ. सुभाष वाघमारे संरांनी कायम सुरु ठेवली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रा. पाटील सर अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीतून उभे राहीले आहेत. सर म्हणजे माणसं मिळवणारी चालती बोलती प्रयोग शाळाच आहे . असे गौरोद्गार काढले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा .भगवानराव पाटील , म्हणाले . . आज समाजामध्ये पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारांची गरज आहे. माझी सहचारणी प्रेमळ स्वभावाची असल्यामुळेच माझा माझी विद्यार्थ्यांचा संच खुप मोठा आहे. असे सांगताना पत्नीच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला. पुढे बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांना मी पुस्तकी ज्ञानाबरोबरच , व्यवहारज्ञान शिकवत होतो. विद्यार्थी हीच माझी संपत्ती आहे . “शामच्या आईच्या ” पुस्तकाचा प्रभाव कायम माझ्यावर आहे. त्यामुळेच मला विद्यार्थी घडविता आले. मुलांवर , प्राणी मात्रावर , समाजातील प्रत्येक घटकावर प्रेम कसे करावे हे मला साने गुरुजींच्या कडून शिकायला मिळाले. ३८ वर्षांच्या रयतच्या सेवेत अनेक विद्यार्थी घडवले .व ते माझ्याशी कुटुंबा प्रमाणे जोडले आहेत . हीच माझी खुप मोठी संपत्ती आहे. असे त्यांनी सांगीतले.
यावेळी माजी विद्यार्थी यांचे वतीने प्रतिनिधी म्हणून समृध्दी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी उपस्थीत मान्यवर , जेष्ट गुरुवर्य यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले . त्यानंतर गुरुवर्य प्रा . बी .डी. पाटील यांच्यावर माजी विद्यार्थी यांनी तयार केलेल्या “प्रेरणास्तंभ ” या गौरवग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आहे. गौरव ग्रंथासाठी लेखन केलेल्या माजी विद्यार्थांचा प्रा. पाटील सरांचे हस्ते गौरव ग्रंथ देवून सन्मान करण्यात आला. तर माझी विद्यार्थी यांचे वतीने गौरव सन्मानपत्र देवून सरांचा यथोचीत सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक , प्रेरणास्तंभ गौरव ग्रंथाचे संपादक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचा हेतू विषद केला. प्रा. पोपटराव काटकर , प्रा . विश्वजीत जाधव यांनी सुत्रसंचलन , तर प्रा . सुनिल शिंदे यांनी आभार मानले.
फोटो
प्रा. बी. डी. पाटील यांचा गौरव सन्मानपत्र देवून सत्कार करताना शिवाजी कॉलेजचे व सरांचे माजी विद्यार्थी.



