कुसुंबी.दि.२८. बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने शनिवार दि.२५/२/२०२३ कुसुंबी येथे दक्षिण विभागीय मिटिंग आयोजित केली होती दक्षिण विभागातील प्रमुख कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्तीत होते.मिटिंगमध्ये धरणा संदर्भात जगन्नाथ जाधव , श्रीरंग बैलकर ,राजेंद्र जाधव,विनोद शिंगटे ,विलास शिर्के यानी विचार मांडले.
बजरंग चौधरी यांनी रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी कुसुंबी येथे जाहिर मेळावा घेण्याचा ठराव मांडला त्यास दक्षिण विभागातील जेष्ठ मार्गदर्शक गेणू बुवा दुंदळे व मारुती चिकणे (बापू ) सरपंच कुसुंबी यांनी जाहीर पाटींबा दिला महिला व पुरुष मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्यासह दक्षिण विभागाचा जाहीर मेळावा घेण्याचे ठरले तसेच सायळी ते गोंदेमाळ पर्यंतचे सर्व गावचे सरपंच पदाधिकारी उपस्थित होते प्रत्येक गावच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा मानस जाहीर केला.
यावेळी दक्षिण विभागातील ज्येष्ठ मार्गदर्शक शेतकरी मंडळाचे अध्यक्ष गेनु बुवा दुंदळे यांनी यावेळी दक्षिण विभागातील हा मेळावा पहिल्यांदाच होत आहे हा मेळावा केळघर , मेढा विभागापेक्षा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे याकरता माझ्या करंडी गावातील सर्व ग्रामस्थ स्वखर्चाने उपस्थित राहतील तसेच शेतकरी मंडळाच्या वतीने येत्या मंगळवारी सायंकाळी निझरे येथे बैठकीचे आयोजन केले आहे विभागातील सर्व शेतकरी बहूसंख्येने उपस्थित राहतील तसेच मेळावा कुसुंबी गावातच होत आहे आमच्याच गावची जमीन सर्वांत जास्त ओलीताखाली येणार आहे आम्हीही निर्धार करतो या मेळाव्यास सर्वात जास्त आमच्या गावचे लोक उपस्थित रहातील मारुती चिकणे (बापू ) कुसुंबी सरपच , मालचौडी गावचे लोक सुद्धा बहूसंख्येने उपस्थित रहातील सरपंच संपतराव रवले यांनी सांगीतले त्यांनी दुंद व आजूबाजूच्या गावची सुद्धा जबाबदारी स्वीकारली.
या बैठकीला विभागातील संतोष बैलकर काळोशी ,गेनुबुवा दुंदळे करंडी , मारुती चिकणे सरपंच कुसुंबी, धोंडीराम सपकाळ मा.सरपंच म्हाते बु, बजरंग आठवे काळोशी , संजय कदम मा.सरपंच मालचौडी , बजरंग वांगडे पिंपरी , शांताराम वांगडे सरपंच पिंपरी , बाजीराव चिकणे कुसुंबी , विकास देशमुख गांजे , पुंडलिक पार्टे सरपंच गोंदेमाळ , विनोद शिंगटे मुंबई निमंत्रक ,विष्णू धनवडे , मा. सरपंच विलास धनवडे मोहट सरपंच , ज्योतीराम पवार निझरे , लक्ष्मण भिलारे निझरे , आनंदराव सपकाळ मा. चेअरमन जावली बँक , बजरंग दळवी म्हाते , रामदास वेंदे अध्यक्ष काळेश्वरी ट्रस्ट , ज्ञानेश्वर चिकणे , विश्वास दुंदळे ,विलास दुंदळे, जगन्नाथ जाधव बाहुळे , श्रीरंग बैलकर , विजय सपकाळ सरपंच चोरांबे , सुरेश कासुर्डे उप सरपंच , विलास शिर्के सरपंच , बंडू पार्टे पुनवडी राजेंद्र जाधव दक्षिण विभागातील व बोंडारवाडी धरण कृती समितीचे पदाधिकारी उपस्तीत होते उपस्थित सर्वांचे आभार बजरंग चौधरी यांनी मानले.



