महाराष्ट्रसातारासामाजिक

रेंगडी येथे ऐन उन्हाळ्यात धबधब्याला आलेल्या अशुद्ध पाण्यामुळे वन्यप्राण्यांसह मानवी आरोग्याला धोका

केळघर. दि.२८. सातारा मेढा महाबळेश्वर रोडवर शनिवारी सकाळी ११ वाजता अचानक रेंगडी गावाच्या हद्दीत काळयाकड्या जवळ अचानक धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले.

हाँटेल,लॉजेस, बंगल्यातून बाहेर पडणारे सांडपाणी पूनर्प्रक्रीया केल्याशिवाय भूपृष्ठावरील कोणत्याही पाण्याच्या स्त्रोतात जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्यानंतरही कोणीही ही बाब गंभिरतेने घेतली नाही. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. हॉटेल्सची आपापल्या सांडपाण्याची व्यवस्था न केल्याने हे पाणी पाईप लाईन करून आपल्या हॉटेल पासून थोड्या अंतरावर सोडण्यात आलेले पाणी काही अंशी ओढ्याच्या माध्यमातून नैसर्गिक रीत्या वन्य प्राण्यांच्या पाणवठा व मानवी पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक असलेले पाणवठे जवळ असल्याने या सांडपाण्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

आज उन्हाच्या झळांनी मानव व पशु पक्षी व जंगलातील प्राणी पाण्याच्या शोधात वण वण फिरत आहेत अश्या प्रकारचे अशुद्ध पाणी मोकळ्या जागेत सोडल्यामुळे हे पाणी पिण्याने मुक्या जनावरांचे तसेच वन्य प्राण्यांचे जिवन ही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हे पाणी कोठून येत असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची स्थानिकांकडून मागणी होत आहे.

महाबळेश्वर पासून काही अंतरावर असलेल्या परिसरात हॉटेल्स व बंगले बांधण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून मुकवली मुरा,रेंगडी,रेंगडीवाडी या सारख्या छोट्या गावात खाजगी बंगल्यांसह मोठ मोठी हॉटेल्स बांधण्यात आली आहेत.येथील सांडपाण्याची व्यवस्था योग्य नसल्याने पाणी प्रदुषित होत आहे. शासनाकडून ठरवून देण्यात आलेले पाण्यातील प्रदुषणकारी घटकांचे प्रमाण किती असावे, हाँटेल मेजवानी सभागृहे यांच्यासाठीचे निकषही ठरले आहेत.मात्र त्या निकषाचे पालन येथे होते नसल्याचे उघड होत आहे. पाण्याचे प्रदुषण टाळण्यासाठी पाण्यावर पूनर्प्रक्रीया करणारी यंत्रणा येथे कदाचित बसविण्यात आली नसावी, यामुळे हे अशुद्ध पाणी मोकळे सोडले असावे.

तसेच सांडपाण्याचा वापर हा शौचालय,फरशी धुणे, बगिच्यासाठी पूनर्वापर केला तर मानवी आरोग्यासह परिसरातील वन्य प्राण्यांनाही हानिकारक होणार नाही या गोष्टीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!