महाराष्ट्रसातारा

सातारा जिल्हा सहकार सेवकांच्या पतसंस्थेच्या चेअरमन पदी -प्रिया कांबळे व्हा.चेअरमन पदी- संजय वेंदे यांची बिनविरोध निवड

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —– मेढा / प्रतिनिधी

मेढा.दि.२३. सातारा जिल्हा सहकारी खात्यातील सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या., सातारा ची संचालक मंडळाची सन २०२२ -२३ ते २०२७ -२८ सालासाठी ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमन पदी . श्रीमती प्रिया उमाकांत कांबळे व व्हा. चेअरमन पदी संजय विष्णू वेंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .


सन २०१४ सालापासुन सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या सर्व निवडणूका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण , महाराष्ट्र राज्य . पुणे या स्वतंत्र यंत्रणेमार्फत घेणेत येत आहेत .त्या प्रमाणे सातारा जिल्ह्यातील सहकार खात्याच्या मार्फत खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून मोठया प्रमाणावर निवडणूकीचे कामकाज केलेले आहे. परंतु याच सहकार खात्याच्या सेवकांची अर्थवाहीनी असलेल्या सातारा जिल्हा सहकारी खात्यातील सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या., साताराची निवडणूक प्रक्रिया हि बिनविरोध पार पाडून एक वेगळा आदर्श इतर सहकारी संस्थाच्यापुढे ठेवलेला आहे. बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाल्यामुळे संस्थेवर पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला फाटा मिळालेला आहे. तसेच सेवकांमध्ये संघटन कौशल्य वाढीसाठीही बळ मिळाले आहे.


निवडणूक निर्णय अधिकारी तथा संस्थेचे मानद सचिव प्रमोद गणपतराव चतुर यांनी महत्वाची भूमिका पार पाडून संस्था बिनविरोध करून संस्थेचे हित जोपासण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.संस्थेचे नवनिर्वाचीत संचालक म्हणून श्रीमती प्रिया उमाकांत कांबळे( चेअरमन )संजय विष्णु वेंदे( व्हा.चेअरमन), विलास मोरे,सौ.सिमा भागवत,बाळासाहेब राजेभोसले,अतुल यलमार,नागेश यादव,अनंत लंबे,तानाजी देशमुख,संतोष आवळे, काशिनाथ खोत,नितीन पवार व महेश पोळ,सुहास आंब्राळे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाले बध्दल जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था सातारचे मनोहर माळी, जिल्हा विशेष लेखापरिक्षक,सहकारी संस्था वर्ग १ साताराचे श्रीधर कोल्हापुरे,महाराष्ट्र राज्य सह.खाते कर्मचारी संघटना सरचिटणीस व महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख यांच्यासह सातारा जिल्हयातील विविध संस्थांचे कर्मचारी , संघटना यांनी अभिनंदन केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!