सातारासामाजिक

उच्चपदस्थ अधिकारी रमले पुस्तकांच्या गावा!

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —— प्रतिनिधी मोहन जगताप

सातारच्या ‘भिलार’ची राज्यातील अधिकाऱ्यांना भुरळ


सातारा दि.०७.नोंदणी महानिरीक्षक विभागाचे (आयजीआर) राज्यातील १४ मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निबंधक आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील १७ शिक्षण उपसंचालक यांना बुधवारी पुस्तकाच्या गावाने अक्षरशः भुरळ घातली. हे उच्चपदस्थ अधिकारी दिवसभर या गावी रमले. निमित्त होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित क्षेत्रभेटीचे!

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे सन २०१७ पासून पुस्तकाचे गाव म्हणून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने घोषित केले आहे.

नोंदणी महानिरीक्षक विभागातील गजानन वाखडे, के आर. दवंगे, विजय भालेराव, किशोरकुमार मगर, हेमलता जगताप, संतोष हिंगाणे, गोविंद गीते, श्रीकांत सोनवणे, के एस कांबळे, सुनील पाटील, अशोक आटोळे, आर जी जानकर, आर टी नाईक, प्रकाश खोमणे आणि शालेय शिक्षण विभागातील श्रीराम पानझाडे, हारून आतार, वंदना वाहूळ, राजेश क्षीरसागर, रमाकांत काटमोरे,अनुराधा ओक, औदुंबर उकिरडे, डॉ.सुभाष बोरसे, वैशाली जामदार, सुधाकर तेलंग, चिंतामण वंजारी, संदीप संगवे, राजेंद्र अहिरे, ए एस साबळे, शिवलिंग पटवे, निशादेवी वाघमोडे, माधुरी सावरकर हे सर्व वर्ग एकचे अधिकारी राज्यातील विविध जिल्ह्यातून भिलार मध्ये आले होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!