सातारासामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जावलीत भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन

स्टार ११ महाराष्ट्र

केळघर.दि.२१. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे जावली तालुक्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक रक्तदात्यांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन भाजपचे जावली तालुका युवक अध्यक्ष सागरजी धनावडे यांनी केले आहे.

राज्याचे बांधकाममंत्री ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सूचनेप्रमाणे  मंगळवार दिनांक २२ जुलै रोजी पंचायत समिती जावली येथे रक्तदात्यांनी आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन सागरजी धनावडे यांनी केले आहे.

केळघर येथे झालेल्या बैठकीस कुसुंबी गटाच्या मंडल अध्यक्ष मारुती चिकणे,प्रदीप शेलार,शाम धनावडे,विकी दळवी,आकाश भिलारे,साहेबराव पवार,किसन सपकाळ,दत्ता जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळीभाजप युवामोर्चाच्या पुढील वाटचाली संदर्भात युवासंवाद साधण्यात आला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!