महाराष्ट्रसातारासामाजिक

ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषद मेळव्यासंदर्भात महाबळेश्र्वर येथे बैठक

स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर.दि.२१.ओबीसीच्या संदर्भात आपण पावलोपावली जागृत राहीलं पाहीजे नाहीतर आपलं अस्तीत्वच राहणार नाही . आज राजकीय आरक्षण घालवलं,उद्या शैक्षणिक जाईल, त्यानंतर नोकऱ्या जातील हा ओबीसी समाजच अस्तित्वहीन होईल त्यामुळे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्येक ओबीसीचे जात समुदाय एकत्र येवून ओबीसींनीच ओबीसीसाठी आपल्या न्याय हक्कासाठी उद्याच्या २६ मार्च रोजी सांगली येथे होणाऱ्या ओबीसी व्हीजेएनटी परीषदेच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी नेते कल्याणराव दळे यांनी केले.
२६ मार्च रोजी सांगली येथे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषद मेळव्यासंदर्भात राज्याचे ओबीसी बहुजन नेते मा.कल्याणराव दळे साहेब यांचा सातारा जिल्ह्याचा दौराचा शुभारंभ महाबळेश्वर येथून झाला यावेळी ते बोलत होते .

        यावेळी ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषद प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा एसबीसी संघर्ष समिति चे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रयजी चेचर यांनी मार्गदर्शन करताना ते म्हणाले. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन जेष्ठ नेते भाऊ दळवी, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, ओबीसी जिल्हा समन्वयक व महाराष्ट्र नाभिक महामडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ ,
पश्चिम महाराष्ट्र संघटक संजय परदेशी हरिदास जाधव महामंडळांचे जिल्हा सचिव अजय काशिद उपस्थित होते .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल लोहार होते .
यावेळी महाबळेश्वर तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते २६ तारखेला सांगली येथे येतील असा विश्वास ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल लोहार यांनी व्यक्त केला . महाबळेश्वर तालुक्यातून जास्तीत ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने यावे असे आवानही अनिल लोहार यांनी सांगीतले .

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!