कृषीसातारा

सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा शंभर दिवस कार्यक्रमामध्ये पुणे विभागात प्रथम क्रमांक

स्टार ११ महाराष्ट्र

सातारा, दि.२९. शंभर दिवस कार्यालयीन सुधारणांतर्गत राज्याच्या सर्व महसूली विभागातील कृषीच्या ४२ जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल घोषित झाला असून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा कार्यालयाला पुणे महसूल विभागात पहिला क्रमांक तर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कृषी विभागात दुसरा क्रमांक मिळालेला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम नुकतीच राबविणेत आली. सदर मोहिमे अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय दैनंदिन कामकाज व अथक परिश्रम करून अनुक्रमे संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता (अभिलेख निदणीकरण व वर्गीकरण, मुदतबाह्य अभिलेखे नष्ट करणे, जड वस्तू संग्रह नोंदवही अद्यावतीकरण करणे यासह कार्यालयास भेट देणा-या शेतकरी व इतर अभ्यांगतासाठी सुसज्ज प्रतीक्षालय, कृषी ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.

तसेच नाविण्यपूर्ण उपक्रमातंर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा व अधिनस्त ९ कार्यालयांना ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झालेले आहे. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्हा एकूण १० कार्यालये ISO 9001:2015 मानांकन असलेला एकमेव पहिला जिल्हा ठरला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!