सातारासामाजिक

जावली तालुक्यात नागरिकांना आपत्ती व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन

तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या उपस्थितीत नागरिकांना आपत्ती व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन

स्टार ११ महाराष्ट्र –

केळघर.दि.२९. जावली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पावसामुळे संभाव्य दरडप्रवण व पुरप्रवण क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या गावामध्ये दरड कोसळून किंवा अचानक पूर आल्यावर शोध व बचाव पथक शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी गाव पातळीवरील नागरिकांना तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली केळघर येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील,निवासी नायब तहसीलदार सुनील मुनाळे,महसूल नायब तहसीलदार निसार शेख,तज्ज्ञ प्रशिक्षक लखन गायकवाड,मंडल अधिकारी उमेश डोईफोडे तलाठी संदिप ढाकणे,तलाठी सुनीता सूर्यवंशी, ग्रामसेवक शिवाजी निर्मल,माजी सरपंच बबनराव बेलोशे, माजी सरपंच रविंद्र सल्लक, केंद्र प्रमुख बळवंत पाडळे माजी सरपंच रमेश वाडकर उपस्थित होते.

  केळघर विभागातील महसूल अधिकारी/कर्मचारी,ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,यांना आपत्ती व्यवस्थापनाचे व दरडी कोसळयापूर्वी निसर्गाकडून प्राप्त झालेले संकेत ओळखणे तसेच गावस्तरीय शोध व बचावासाठी वितरीत केलेले साहित्य वापराबाबत यशदा पुणे येथील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनचे तज्ज्ञ प्रशिक्षक लखन गायकवाड यांनी केळघर विभागातील दरड प्रवण व पूरप्रवण गावातील गाव स्तरावरील गठीत केलेली समिती मधील सर्व सदस्य,पोलिस पाटील, ग्रामसेवक, कृषीसेवक/कृषीसहायक,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,मंडळातील सदस्य, उत्कृष्ट पोहणारे युवक, ग्रामस्थ यांना प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये दरडप्रवण व पुरप्रवण भागामध्ये दरडी कोसळणेच्या अनुषंगाने आवश्यक त्या खबरदारीच्या उपायोजने बाबत सविस्तर मार्गदर्शन करणेत आले तसेच सर्पदंश झालेस प्रथमोपचार याबाबत तातडीचे करावयाचे उपायोजनेचे प्रशिक्षण व अपघात ग्रस्त परिस्थीती उद्भवल्यास करावयाचे उपायोजना याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले.

प्रशिक्षण बाबतचे नियोजन नायब तहसीलदार मंडल अधिकारी उमेश डोईफोडे,तलाठी संदिप ढाकणे,तलाठी सुनीता सूर्यवंशी तहसिल कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!